विभाग पहिला - वैदिक संस्कृति 15
६०. बाबिलोनियन इतिहासाचा ज्याला थोडाबहुत परिचय आहे, त्याला इंद्राची गणना देवांत झाल्याबद्दल मुळींच आश्चर्य वाटणार नाहीं. बाबिलोनियामधील पुष्कळशा सम्राटांची त्यांच्या हयातींतच देवांत गणना करण्यांत आली होती. त्यांना सोमपानासाठीं निमंत्रण देण्याचा मोठा विधि होत असे. अशा विधींचीं बरींच कोरीव चित्रें बाबिलोनियांत सांपडलीं आहेत. तेथील सम्राटांच्या पद्धतीस अनुसरून इंद्रानेंहि आपली गणना देवांत करून घेतली, व तिचा फैलाव आपल्या साम्राज्यांत केला असला पाहिजे.
६१. एलाममध्यें अनेक घडामोडी घडून आल्यामूळें इंद्र, त्याचे अनुयायी देव व मदतनीस मरुत् यांचें नांव देखील त्या प्रदेशांत राहिलें नाहीं. परंतु वैदिक वाङ्मयाच्या रूपानें हिंदुस्थानांत आजलाहि तें अस्तित्वांत आहे. यांत आश्चर्य मानण्याजोगें कांहीं नाहीं. बुद्धाचा धर्म हिंदुस्थानांत उदय पावला, व आरंभीं त्याचा विस्तारहि येथेंच झाला. असें असतां मुसलमानी कारकिर्दीत सामान्य लोकांत त्याचें नांव देखील राहिलें नाहीं. इंद्राला आणि देवांना जसे पर्शियन लोक राक्षस समजूं लागले, त्याप्रमाणें हिंदुस्थानचे लोक बौद्धांना नास्तिक म्हणूं लागले. पण त्या बौद्ध धर्माचा विजय दक्षिणेकडे सिलोन, उत्तरेकडे तिबेट व पूर्वेकडे ब्रम्हदेश, सयाम, चीन, जपान वगैरे देशांत झाला. त्याचप्रमाणें इंद्राचा आणि देवांचा त्यांच्या देशांत लोप होऊन हिंदुस्थानांत विजय झाला, असें म्हटलें पाहिजे.
६२. येथें असुरांसंबंधानें दोन शब्द लिहिणें अप्रस्तुत होणार नाहीं. सध्या सुर म्हणजे देव, व जे देव नव्हत, देवांचे शत्रु ते असुर अशी सामान्य लोकांची समजूत आहे. पण तिला वैदिक वाङ्मयांत मुळीच आधार नाहीं. सुर हा शब्द वैदिक वाङ्मयांत कोठेंहि सांपडत नाहीं; व असुर हें विशेषण इंद्र, वरुण, मित्र, अग्नि इत्यादि देवांना लावण्यांत आलें आहे. ‘अनायुधासो असुरा अदेवाः’ ऋ० ८।९६।९, या वाक्यांत तर सर्व देवांचा समावेश असुरांतच केलेला दिसतो. असुरांपैकींच देव, तेव्हां त्यांच्याशिवाय जे इतर असुर, असा याचा अर्थ होतो. ब्राम्हणें, आरण्यकें व उपनिषदें या ग्रंथांतून ‘देवासुराः’ असा प्रयोग अनेक ठिकाणीं सांपडतो. त्याचप्रमाणें प्राचीन बौद्ध वाङ्मयांत ‘देवासुरसंगामो’ इत्यादि प्रयोग सांपडतात. म्हणजे ख्रिस्तापूर्वी सरासरीं दहाव्या शतकानंतर देवांपासून असुरांना भिन्न करण्याचा रिवाज सुरू झाला असावा. त्याला कारणें काय झालीं असावीं हें सांगतां येणें शक्य नाहीं. तरी असीरियन लोकांच्या बाबिलोनियावर स्वार्या होऊन त्यांचा दसरा सर्वत्र बसल्यावर, त्यांचा मुख्य देव असुर असल्यामुळें, असुरांसंबंधानें एलाममध्यें व एलामच्या पूर्वेला सप्तसिंधूंत तिटकारा होत गेला असल्यास नकळे. बाकी असुर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान्, बलवान्, सामर्थ्यवान् असा आहे. असु म्हणजे प्राण; त्या पासून हा शब्द साधला आहे.