A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionvdkbemluntl7aacegckl4j468v4265ia): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

मैत्र जीवांचे | प्रकरण १५: देशप्रेम| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

प्रकरण १५: देशप्रेम

उद्यानात झोपलेल्या अभिजीतला जाग येते. सूर्यादय होत असताना काही वयस्कर मंडळी तिथून जात असतात. त्यांपैकी एकजण सहजच अभिजीतच्या बाजूला येऊन बसतं.

आजोबा, "Good morning my son."

अभिजीत, "Morning."

आजोबा, "I saw you here since a long time."

अभिजीत, "I'm here since last night."

आजोबा, "Don't hurt yourself."

अभिजीत, "No… No… I'm fine sir."

आजोबा, "Are you sure?"

अभिजीत, "Sure sir."

आजोबा, "Life has become a new day. Just enjoy each and every moments of your life."

अभिजीत, "Thank you, sir."

आजोबा निघून जातात. एका अनोळख्या व्यक्तीकडून काही चांगलं ऐकायला मिळालं म्हणून अभिजीतला बरं वाटतं. तो तसाच तिथून जात असतो तेव्हा त्याची नजर उद्यानामध्ये बसलेल्या एका वृध्द गृहस्थाकडे जाते. चेहरा जरा ओळखीचा दिसतो. जवळ जाऊन तो विचारतो, "Sorry Sir, but I think, I saw you somewhere."

अन्ना, "Oh! Really?"

अभिजीत, "I don't remember exactly."

अन्ना, "Go back in your past & find who are you, who I am."

अभिजीत, "I got it. You'r Anna. Anna from India."

अन्ना, "ओळखलंस मला?"

अभिजीतला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो.

अन्ना, "बस बाळा. बस माझ्या बाजूला. खरंतर तुझे आभार मानायला हवे."

अभिजीत, "कशासाठी?"

अन्ना, "इतक्या मोठमोठ्या ओळखी होऊन देखील मी तुझ्या लक्षात आहे."

अभिजीत, "तुम्ही इथे कसे?"

अन्ना, "तू इथे कसा?"

अभिजीत, "मी इथेच राहतो."

अन्ना, "आणि तुझे मित्र?"

अभिजीत, "मी त्यांच्यापैकी कुणाच्याही संपर्कात नाही आहे."

अन्ना, "तुझ्या आणि मित्रांच्या आयुष्यात जे काही घडलं ते माहित आहे मला." अभिजीत गप्प बसतो, "त्यांना भेटत का नाहीस?"

अभिजीत, "जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा कोणीही माझ्या मदतीला आलं नाही."

अन्ना, "गौरी होती नां."

अभिजीत, "कारण तिला पूर्ण परिस्थिती माहित होती."

अन्ना, "बाकीच्यांना पूर्ण परिस्थिती माहित नव्हती म्हणून ते तुझ्या सोबत नव्हते. तुच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस."

अभिजीत पुन्हा गप्प बसतो.

अन्ना, "मैत्री काय असते आणि मित्र एकत्र आल्यानंतर काय करु शकतात हे तुम्ही सर्वांनी दाखवलं होतं. तुमच्या मैत्रीचा शेवट असा होईल हे मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं."

अभिजीत, "मी त्या देशात गेलो तर तिच्या आठवणी माझा पाठलाग सोडणार नाही."

अन्ना, "कुणाच्या आठवणी?"

अभिजीत, "सुवर्णा."

अभिजीत अन्नांना त्याच्या भुतकाळात घडलेला सर्व प्रकार सांगतो. कशा प्रकारे सुवर्णाचा शेवट झाला आणि त्याचं गौरीसोबत लग्न झालं. त्यानंतर आता गौरी आणि त्याच्या वडीलांच्या व्हिडीओ चॅटपर्यंत सर्वकाही तो अन्नांना सविस्तरपणे सांगतो.

अन्ना, "आयुष्यात बऱ्याचदा छोट्या-छोट्या गोष्टीच फार सांभाळाव्या लागतात. म्हणजे बघ, तुझा पेन हरवल्यास तू दुसरा पेन विकत घेऊ शकतोस. मात्र त्याचं टोपण हरवल्यास दुसरं टोपण कुठेच विकत मिळत नाही. आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेली की दुसरी व्यक्ती मित्र किंवा प्रेम म्हणून आयुष्य फुलवायला येऊ शकते. मात्र तुझ्या मनात ती भावनाच नसेल तर..."

त्यांना अडवत अभिजीत, "पूजा करत असताना आपल्याला उद्बत्तीचा चटका लागला म्हणून आपण पूजा करणं सोडून देत नाही, मैत्री आणि प्रेमाचंही असंच असतं अन्ना. वारंवार धक्के बसून देखील माणूस मैत्री आणि प्रेम करणं सोडून देत नाही, फक्त त्या व्यक्तींशी पुर्वीसारखी जवळीक ठेवत नाही"

अन्ना होकारार्थी मान हलवतात.

अन्ना, "तुझं मन आता तुला काय म्हणतंय?"

अभिजीत, "काहीच सुचत नाहिये. या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच डोकं काम करत नाहीये."

अन्ना, "एक सांगू? जी बुध्दी रोगांना आमंत्रण देते ती 'अशुभ बुध्दी' आणि माणसाला थोडे नावडले, जड गेले, अवघड वाटले तरी संतुलन ठेवण्यात मदत करते ती 'शुभ बुध्दी'. कार्याला नुसते मंगल असे म्हटल्याने ते 'मंगल कार्य' होत नाही, तर ज्या कार्यात दोन शक्तींचा, कुटुंबांचा मिलनाचा योग साधलेला असतो, सृष्टीचक्र पुढे जाण्यासाठी मदत झालेली असते, समाजधारणेसाठी आवश्यक असणारे गृहस्थाश्रमाचे युनिट तयार झालेले असते. एकूणच, सर्वांच्या सुखासाठी कारणीभूत ठरलेले असते ते मंगल कार्य, ते शुभ कार्य. दुसऱ्याचे वाईट झाले तरी त्याची मला पर्वा नाही, असे मानणाऱ्यांची, मी माझ्यापुरते पाहणार अशी वृत्ती ठेवणाऱ्यांची, हाती घेतलेल्या प्रोजेक्टमुळे मला फायदा असल्याने त्यापासून इतरांना त्रास झाला तरी पूर्ण करण्याचा अट्टाहास बाळगणाऱ्यांची बुध्दी ती 'भ्रष्ट बुध्दी'. मला दुःख झाले तरी चालेल, पण मी इतरांना दुःख देण्यासाठी कार्य करणार असे म्हणणारी ती 'अती भ्रष्ट बुध्दी'. मला फायदा नाही झाला तरी चालेल, पण इतरांचे कल्याण व्हावे, अशा तऱ्हेने कार्य करणारी आणि असे कार्य करणे जमले नाही, तरी माझ्याबरोबर इतरांचाही फायदा व्हावा असे कार्य करणारी ती 'सुबुध्दी'. जीवनातील सर्व रोगांसाठी, रोगराईसाठी जबाबदार असते ती मनुष्याची 'दुष्ट बुध्दी', 'कुबुध्दी' वा 'भ्रष्ट बुध्दी'."

अभिजीत होकारार्थी मान हलवतो.

अन्ना, "रोगांना आमंत्रण द्यायचे नसेल तर इंद्रियांना योग्य सवय लावणे भाग आहे. त्यासाठी भारतीय परंपरेने सुचविलेली व्रतवैकल्ये, आहार-विहाराचे नियम उपयोगी पडतात. मनाला चांगल्या सवयी लागाव्यात, या दृष्टीने संस्कार उपयोगी पडतात आणि योग्य शिक्षणाच्या माध्यमातून बुध्दीवर उत्तम संस्कार करता येतात, बुध्दीला योग्य मार्गदर्शन देता येते. रोगांना आमंत्रण न देता आरोग्यवान राहायचे असेल, तर इंद्रियांचे नियमन, मनावर मानवतेचे संस्कार, बुध्दीवर श्रध्दा-भक्तीने दिलेले परमेश्वराचे अधिष्ठान, तसेच सत्कर्मप्रेरित कार्य हाती घेण्याची प्रेरणा या गोष्टी आवश्यक ठरतात. आणि तुला हे सर्वकाही व्यवस्थितपणे करायचं असेल तर आयुष्यात मित्र असावे लागतात."

अभिजीतच्या मनातील सर्व संशय, कलह मिटून जातात. तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी होकार देतो. अन्नादेखील खूश होतात. अभिजीत तिथून उठतो, अन्नांच्या पाया पडून थोडं पूढे जातो. अचानक त्याच्या मनात एक प्रश्न येतो,

'अन्ना इथे कसे काय?' हा प्रश्न विचारण्यासाठी तो मागे वळतो तर बाकावर कोणीही बसलेलं नसतं. मग आजूबाजूला बघतो. तेथे त्याच्याशिवाय कोणीही नसतं. स्वतःशीच हसत तो तिथून निघून जातो. उद्यानातून बाहेर जात असताना पाच-सात वेळा तरी तो मागे वळून पाहतो. तिथे कोणीही नसतं.

दुसरीकडे, अभिजीतचं मन दुखावलं म्हणून गौरी स्वतःला त्रास करुन घेते, स्टिफनच्या मनात अपराधीपणाची भावना येते, स्वतःचा हट्टामुळे जीजू दुखावले असं रुपालीला वाटतं, वडीलांच्या निमित्ताने अभिजीतची भारतात येण्याची आशा आता नाहीशी होते.

अचानक अभिजीत घरी येतो. आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर तो गौरी आणि रुपालीला त्याच्यासोबत यायला सांगतो.

गौरी, "कुठे?"

अभिजीत, "आज ऑफिसची पार्टी आहे. सांगितलं होतं ना तुला."

गौरी, "हो. तयार होते लगेच. तुमच्याशी जरा बोलायचं होतं."

अभिजीत, "मला त्या विषयावर काही बोलायचं नाहीये."

गौरी काहीच बोलत नाही. ती रुपालीच्या रुममध्ये जाते. दोघी उंची वस्त्रे घालून तयार होऊन बाहेर येतात. अभिजीतने त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला शोभेल असा ब्लेझर घातलेला असतो. टॉमदेखील चांगल्या पोषाख परिधान करुन बाहेर गाडीजवळ उभा असतो. त्या दोघींशी काही न बोलता अभिजीत गाडीमध्ये येऊन बसतो. नंतर दोघीही येतात आणि गाडीमध्ये बसतात. गाडी सिडनीच्या दिशेने रवाना होते.

नियोजित ठिकाणी स्टिफन आणि त्याची पत्नी मारिया अभिजीतच्या कुटूंबीयांची वाट पाहत असतात. अभिजीतला सहपरिवार आलेलं पाहून स्टिफनला आनंद होतो. त्याने देखील प्रतिष्ठीत असा ब्लेझर परिधान केलेला असतो. कॅरिबियन मित्र आपल्या कुटूंबीयांसोबत त्या प्रशस्त महालात प्रवेश करतात. इंग्लंड, पोलंड, जर्मनी, फ्रान्स, ब्राझिल, भारत, चीन, थायलंड, न्युयॉर्क, कॅनडा आदी देशांमधील मोठमोठे मान्यवर तेथे आलेले असतात. प्रत्येक देशातील प्रतिनिधींनी आपापल्या देशांच्या राष्ट्रध्वजाचं चिन्ह आपल्या ब्लेझरच्या डाव्या बाजूला लावलेलं होतं. अभिजीत आणि स्टिफन ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व करत होते. गुगलच्या सर्व देशांमधील सभासदांनी एकत्र येऊन एकमेकांचा परिचय करुन घ्यावा यासाठी ही मिटींग आयोजित करण्यात आली होती. फेसबूकला देखील गुगलची मोठी जाहिरात करण्यास भाग पाडणारा अभिजीत हा गुगल परिवाराच्या कौतुकाचा मानकरी ठरला होता. प्रत्येक देशातील प्रतिनिधी त्याची भेट घेण्यास उत्सूक होता. रुपाली आणि गौरी अभिजीतच्या डावीकडे अन् उजवीकडे उभ्या होत्या. हॉलिवूड पार्टीमधील अभिनेत्यांप्रमाणे इथे सर्वच व्यक्ती दिसत होत्या. काही देशांचे प्रतिनिधी अभिजीतजवळ त्याच्यासोबत बोलण्यासाठी जातात.

इंग्लंडचे रॉबर्ट, Congratulations! Great job. "अभिनंदन! आपण खुप चांगली कामगिरी केली."

आफ्रिकाचे स्मिथ, You have done a great job for Google. "तुम्ही गुगलची शोभा आणखी वाढवलीत."

अभिजीत, Thanks Sir. All of our working period is progressive. We are accepting new challenges. So we all are successor.  "धन्यवाद सर. परंतु आपणा सर्वांचा कार्यकाल देखील प्रगतीशील आहे. आपण सारेच नव्याची कास धरुन चालतो. आपण सर्वच यशस्वी आहोत."

भारताचे तिवारी, What is the meaning of success? When you search any person on Google, not on Facebook. "यश म्हणजे नक्की काय असतं? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गुगलवर शोधता, फेसबुकवर नव्हे."

चर्चा करीत असलेले सगळेच हसू लागतात. अभिजीतवर उधळली जाणारी स्तुतीसुमने पाहून रुपाली आणि गौरीचे डोळे आनंदाश्रूंनी भरुन येतात.

ब्राझिलचे ब्रेस्टन, I search on Google. To know about you. Have you blocked your Search? "आपली माहिती मिळवण्यासाठी मी गुगलवर आपल्या नावाचा शोध घेतला. आपण आपल्या नावाचा शोध ब्लॉक केलेला आहे का?"

अभिजीत, Yes, I like to stay away from Glamour. "हो. मला प्रसिध्दीपासून लांब रहायला आवडतं."

इंग्लंडचे रॉबर्ट, Really, nobody can knows feeling of Auses. "खरंच, तुम्हा ऑस्ट्रेलियन लोकांची मनं कोणीही ओळखु शकत नाही"

स्टिफन, If Abhi would be a Caribbean then I may be so happy. "अभी पुर्णतः कॅरिबियन असते तर मला जास्त आनंद झाला असता."

इंग्लंडचे रॉबर्ट, Then? Abhijeet from which Country? "मग? अभिजीत कोणत्या देशातील आहेत?"

अभिजीत, Nothing, I am living in Australia from last five years. And I am too happy here. "काही नाही, गेल्या पाच वर्षांपासून मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. आणि यातच मी खूश आहे."

आफ्रिकाचे स्मिथ, Our Country is our Country. Tell us something about your Country. "तरीही आपला देश तो आपलाच असतो. काहीतरी सांगा तुमच्या देशाबद्दल."

ब्राझिलचे ब्रेस्टन, Next time you will be a representative of Head Office. We don't know, whether we will be there or not. But at present, we are together here so please tell us about your Country. "पुढच्या वेळेस आपण कदाचित मुख्य कार्यालयाचे प्रतिनिधीत्व करत असाल. आम्ही तेव्हा असू किंवा नसू माहित नाही. आता सोबत आहोत तर थोडंफार आपल्या देशाबद्दल सांगा."

हातातला रेड वाईनचा ग्लास संपवत अभिजीत, It is very difficult to tell in few words about my Country. "मी ज्या देशातून आलो त्या देशाची माहिती शब्दांत सांगणं कठीण आहे."

इंग्लंडचे रॉबर्ट, At least start to speak. "तुम्ही बोलून तर पहा."

अभिजीत, There is a condition. That I will explain in my Mother Language of that Country. "एक अट आहे. मी त्या देशातील राष्ट्रभाषेतच त्या देशाचं वर्णन करेन."

चीनचे जेन, No Problem, Minimum 12 Languages known persons are present here. "नक्कीच. येथे सर्वजण कमीत कमी १२ भाषांचे जाणकार आहेत."

अभिजीत चेहऱ्यावर थोडं स्मितहास्य आणतो. ग्लास टेबलावर ठेवतो आणि सर्वांना बसायला सांगतो.

गौरी विचारते, "कुठे चाललात?"

अभिजीत तिच्याकडे फक्त नजरेने बघतो. ती पुन्हा गप्प बसते. प्रशस्त महालाच्या मध्यभागी मनोरंजन करत असलेल्या गायकाकडे जाऊन अभिजीत त्याच्याकडून माईक हातात घेतो. अचानक गाणं बंद झाल्याने महालातील सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वजण अभिजीतकडे बघू लागतात. गौरी आणि रुपाली स्टिफन-मारिया यांच्यासोबत डायनिंग टेबलवर बसतात. उपस्थित सर्वांचं लक्ष अभिजीतकडे असतं. तो गौरीकडे बघतो. आपल्याकडे बघत असलेली व्यक्ती अभिजीत नसून त्याचा चेहरा घेऊन जगत असलेली दुःखी व्यक्ती आहे हा विचार मनात आणत गौरी शरमेने खाली मान घालते.

अभिजीत, "जब झिरो दिया मेरे भारत ने, दुनियॉं को तब गिनती आई।
तारोंकी भाषा भारत ने, दुनिया को पहले सिखलाई।

देता ना दशमलव भारत तो, यू चॉंद पे जाना मुश्किल था।
धरती और चॉंद की दूरी का, अंदाज लगाना मुश्किल था।

सभ्यता जहॉं पहले आई, पहले जनमी है जहापे कला।
मेरा भारत वो भारत है, जिसके पिछे संसार चला।

संसार चला और आगे बढा, यू आगे बढा, बढता ही गया।
भगवान करे ये और बढे, बढता ही रहे और फूले फले।"

गौरी अभिजीतकडे बघतच राहते. तीचा स्वतःच्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसत नाही. रुपाली स्टिफनकडे बघत म्हणते, 'जीजू मनोजकुमारचं गाणं गात आहेत.'

भारताचे तिवारी, "I got it. I know, he is Indian. Sing this song my bro. Sing this song. I also proud to be an Indian."

संपूर्ण जगाचे प्रतिनिधी उभे राहून जोरजोरात टाळ्या वाजवत अभिजीतच्या आवाजाचं कौतूक करतात. गौरीच्या आनंदाला सीमा उरत नाही. ती धावत अभिजीतला मिठी मारते.

गौरी, "आय लव्ह यु सो मच..."

माईक चालू असल्याने संपूर्ण महालात तिचा आवाज गुंजतो. उपस्थित सर्वांना हसू येतं. अभिजीत देखील हसतो. गौरी लाजून त्याला घट्ट पकडते. अभिजीत माईक बाजूला करतो.

अभिजीत, "लव्ह यु टू... आईबाबांना भेटायचंय ना!"

गौरी मिठीतच 'हो' म्हणते. हा चमत्कार अन्नांचा असतो. दोघांच्याही चेहऱ्यावरील ते हास्य खूप वेगळं असतं. त्या दोघांपेक्षाही आनंदी आणखी दोघे असतात, रुपाली आणि स्टिफन. त्या दोघांनी मनात आणलं नसतं तर आज तो ग्रुप पुन्हा एकत्र झालाच नसता.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका
मनोगत
मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’
प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात
प्रकरण २ : विरहातील पहिला भाग
प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग
प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग
प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे
प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने
प्रकरण ७: अंधूक आशा
प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये
प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी
प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी
प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन
प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात
प्रकरण १३: विवाहाचं रहस्य
प्रकरण १४: वडीलांचा आधार
प्रकरण १५: देशप्रेम
प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: