A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_session49qkjjthd48fdsfjuoslc0srq72b1ctr): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

मैत्र जीवांचे | मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’

मनापासून मैत्री जगणा-या प्रत्येकास समर्पित केलेली अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित 'मैत्र जीवांचे' कादंबरी कविता सागर प्रकाशनचे सर्वेसर्वा माझे परममित्र आदरणीय डॉ. सुनील दादा पाटील यांनी मला वाचनासाठी दिली. 'मैत्र जीवांचे' या कादंबरीच्या नावापासूनच कुतूहल निर्माण झाले. फेसबुक, व्हाट्सअँप व आंतरजालच्या युगात निखळ मैत्रीची दृढ नाती प्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षाही पक्की करणारी ही कादंबरी शेवटपर्यंत मैत्रीची उत्कंठा वाढवणारी आहे.

मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेल्या तरुण - तरुणी कालांतराने त्यांच्यातील संबंधाने एका वेगळ्याच नात्यात, आयुष्यात एकत्र येतात परंतु त्यांच्यातील भावनिक कलहातून वितुष्ट निर्माण होते, त्यातून निर्माण झालेली स्थित्यंतरे सदर कादंबरीत सरळ साध्या सोप्या भाषेत अत्यंत नेटकेपणाने मांडण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे.  

शरद - अशोक यांच्या संगीताने, अभिजितच्या दिलखेचक आवाजाच्या अदाकारीने, अजयच्या फोटोग्राफीने तसेच प्रसादच्या मंत्रमुग्ध करणा-या निवेदनाने अल्पावधीतच मुंबईतील मित्र - मैत्रीणींनी एकत्र येऊन उभारलेल्या बदमाश ग्रुपने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केलेला असतो. परंतु एका संगीत स्पर्धेतील अपयशाने संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या बदमाश बँडला रसातळाला कसे जावे लागले; त्यातून सर्व मित्रांच्यात काशी ताटातूट झाली याचे वर्णन मनाला चटका लावून जाते.

भारतीय विशेषकरून महाराष्ट्रातील तरुण - तरुणी शिक्षण घेऊन डिग्री मिळवतात परंतु भ्रष्ट राजकारण्यांच्यामुळे त्यांना नोकरीकरीता पैशाची मागणी केली जाते त्यातून त्यांच्या मनात धगधगणारा राग कसा व्यक्त होतो. तसेच मित्राचे लाईफ घडविण्यासाठी त्यांची धडपड कशी चाललेली असते हे प्रस्तुत कादंबरीत चांगल्या प्रकारे मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे.

नेहमी हसत खेळत असलेल्या, आपल्या अदाकारीने तरुणांना घायाळ करणा-या अभिजीतच्या जीवनात झालेले स्थित्यंतर त्यातून त्याच्या वर्तनात झालेला बदल त्याविषयी ऑफिसमधील स्टीफनने मांडलेले विचार, मैत्री अतूट राहण्यासाठी स्टीफनसह त्याच्या महाराष्ट्रातील मित्रांनी केलेली धडपड कादंबरीची उंची वाढविण्यात यशस्वी झालेले आहेत.

ऑस्ट्रेलियात अभिजीत, गौरी व रुपाली एकत्र राहून अभिजितने करिअर करण्याचा प्रयत्न केला. गौरी व अभिजित यांच्यात मित्रत्वातून निर्माण झालेले पती - पत्नी यांचे नाते. वागण्यात बदल घडावा यासाठी गौरीने जर्मन पर्यटनाचे केलेले आयोजन. पर्यटनानंतर अभिजितमध्ये झालेला बदल घरातील तसेच ऑफिसमधील सर्व कर्मचा-यांना थक्क करून सोडतो.

मित्रांपासून दूर फेकलेल्या, परदेशात नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या अभिजीतला जुन्या आठवणीने घायाळ केल्यामुळे अंतर्मुख बनलेल्या अभिजीतला परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणा-या तसेच गैरसमजातून दूर गेलेला प्रसाद त्याच्यासाठी कोणते प्रयत्न करतो; त्यासाठी रुपाली व स्टीफनची मदत कशी होते हे भावनापूर्ण शब्दात लेखकाने मांडलेले आहे.

'गरीबाच्या वाड्या'वरील मित्रांच्या गप्पाटप्पा, मैफली बाबतचे विचार, वादविवादातून निर्माण झालेले प्रसंग, साहित्याची मोडतोड ह्यातून निर्माण झालेली एकटेपणाची वृत्ती त्यातून निर्माण झालेले संघर्षमय जीवन, या संघर्षमय जीवनाच्या अंधारातून मैत्रीच्या प्रकाशाकडे जाणारा एक धागा पकडून लेखकाने मांडलेले विचार, त्यातून निर्माण झालेली तगमग याचा हृदयस्पर्शी अनुभव या 'मैत्र जीवांचे' या कादंबरीतून व्यक्त होतो.

जर्मन पर्यटनासाठी अभिजित व गौरी यांच्या जाण्याने त्या दोघांमध्ये असलेले भूतकाळातील गैरसमज, टॉमला पुत्ररत्नाने झालेला आनंद, त्याने अभिजितला सांगितलेली ही आनंदाची बातमी, त्यातून अभिजित व गौरी यांच्यात जर्मन पर्यटनात निर्माण झालेले शारीरिक आकर्षण, अभिजितमध्ये झालेला बदल, त्यातून गौरी व अभिजित यांच्यात निर्माण झालेल्या आशा - आकांक्षा पाहून कार्यालयातील सर्वांनाच थक्क करणारे लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांनी केलेले वर्णन कथानकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

अभिजितसोबत पाच वर्षे काम करणा-या स्टीफनला अभिजितच्या व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण असते. त्यातून अभिजितच्या अनुपस्थितीत रुपालीशी संपर्क साधून स्टीफनने फेसबुक, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या सर्व मित्र - मैत्रिणींची माहिती गोळा करून अभिजितसह इतर मित्र - मैत्रिणींना एकत्र आणून त्यांच्यात पूर्वीचा आनंद निर्माण करण्यासाठी स्टीफनने भारतात येऊन महाराष्ट्रातील बदमाश बँडला एकत्र आणण्याचा केलेला प्रयत्न याचे हृदयस्पर्शी वाचन करतांना कादंबरीचा शेवट कसा झाला हे कळतच नाही. 'मैत्र जीवांचे' या कादंबरीचा शेवट बदमाश बँडबाबत विचार करण्याच्या स्टीफनच्या प्रश्नाने ह्या बँडच्या भावविश्वात तर्कवितर्क मांडण्यात लेखक अत्यंत यशस्वी झाले आहेत.

'मैत्र जीवांचे' ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या मित्र - मैत्रिणींनी दिलेले प्रोत्साहन, आई - वडिलांचे मार्गदर्शन, पत्नीची मदत, गुगल प्ले स्टोरवर कादंबरी उपलब्ध करून देणारे अक्षर प्रभूदेसाई, इंटरनेटच्या माध्यमातून व प्रकाशनाची जबादारी स्वीकारणा-या जयसिंगपूर येथील कविता सागर प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील अशा दिग्गजांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या अद्वितीय कादंबरीस व प्रतिभावान लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांना लाख - लाख शुभेच्छा!

- नंदकुमार शंकरराव गायकवाड (जयसिंगपूर)
9822469955

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका
मनोगत
मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’
प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात
प्रकरण २ : विरहातील पहिला भाग
प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग
प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग
प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे
प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने
प्रकरण ७: अंधूक आशा
प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये
प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी
प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी
प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन
प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात
प्रकरण १३: विवाहाचं रहस्य
प्रकरण १४: वडीलांचा आधार
प्रकरण १५: देशप्रेम
प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: