Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ७: अंधूक आशा

अजय, "जर्मनीला? जर्मनीला का?"

प्रसाद, "माहित नाही. रुपाली म्हणाली, ते दोघे जर्मनीला गेलेत म्हणून."

शरद, "मग आता?"

अजय, "रुपालीला त्याचा पर्सनल ई-मेल आय.डी. माग."

प्रसाद, "त्याने काय होईल?"

अजय, "तो फक्त ऑफिसच्या कामानिमीत्त कुणालाही भेटत असेल तर त्याला ऑफिशीयल भेटू. आता नम्रता आणि तिचे वडिलसुध्दा आपल्या ग्रुपबद्दल पॉझिटिव्ह झाले आहेत. ते आपल्याला पैशांची नक्कीच मदत करतील."

प्रसाद, "तूला वाटतं, तुझी ही आयडीया काम करेल?"

अजय, "हे बघ, मी आमच्या कंपनीतर्फे त्यांच्याकडे शेयर्स घेण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी एक मेल पाठवेन. एकदा त्याच्याशी कॉन्टॅक्ट तर होऊ दे. मग पुढे बघू आपण."

प्रसाद रुपालीला अभिजीतचा ऑफिसमध्ये वापरत असलेला आय.डी. मागतो, रुपाली त्याला संध्याकाळपर्यंत थांबायला सांगते. आता अजय विचार करतो, अभिजीतला नक्की काय मेल करावा, जेणेकरुन तो आपल्या मेलचं उत्तर देऊ शकेल. त्याला विचार करायला वेळ इतका कमी पडतो की, प्रसाद अभिजीतचा आय.डी. घेऊन येतो.

प्रसाद, "अजय, परत एकदा विचार कर."

अजय, "तेच तर कळत नाही ना! त्याला नक्की कोणता मेल पाठवू."

प्रसाद, "रुपालीच्या सांगण्यानुसार तो आता पुर्वीसारखा नाहीये. खूप बदललाय. आपण त्याला आता कॅच करु शकतो असा कोणता बदल झालाय हे माहीत नाही."

अजय, "विचार करता करता असा विचार सुध्दा मनात आला होता."

प्रसाद, "कसला विचार?"

अजय, "अभीला परत आणनं इतकं सोपं नाही. त्यात नुसतं त्यालाच नाही, गौरीला सुध्दा परत आणायचं आहे. हे बघ, तो मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय. ज्या वेबसाईटचे फक्त मेल चेक करनं आणि अकाउंट क्रिएट करणं या दोनचं गोष्टी आपल्याला माहित आहेत, त्या कंपनीमध्ये तो खूप मोठ्या पदावर आहे. त्याला पेमेंट पण मजबूत मिळत असणार. आणि रुपालीच्या सांगण्यावरुन गौरी सुध्दा तिथे खूशच आहे ना! मग आपण त्या दोघांना इथे आणण्याचा प्रयत्न केला तर उगाच त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स होतील."

प्रसाद, "हं.... बरोबर बोलतोयस. मग? काय करायचं? त्या दोघांचा विचार सोडून द्यायचा?"

अजय, "त्या दोघांसारखे प्रेमळ मित्र-मैत्रिण आपल्याकडे होते, अशी आठवण ठेवून जगूया. या पलीकडे आपल्याला काय करता येईल?"

प्रसाद स्वतःशीच हसतो आणि म्हणतो, "आपण काय करणार? आता केवळ देवच काहीतरी चमत्कार करु शकेल. चल, सोड तो विषय, खाली चल. जेवण तयार आहे आणि नम्रतापण येईलच थोड्या वेळात. जेवायला बसू तेव्हा बाकीच्यांना त्यांचा विषय सोडायला सांगू."

अजय, "हो पॅडी, उगाच कशाला त्या दोघांच्या आयुष्यात आता ढवळाढवळ करायची? आता ते दोघे फक्त मित्र-मैत्रिण नाही राहीलेत, तर चक्क एकमेकांचे जीवलग हमसफर झाले आहेत."

प्रसाद आणि अजय टॅरेसवरुन खाली जातात. दोघांनीही ऑस्ट्रेलियन कपल म्हणजेच अभिजीत आणि गौरीचा विषय सोडलेला असतो. कारण त्या दोघांना पूर्ण खात्री असते, काही झालं तरी ते दोघे येणार नाहीत.

खाली गेल्यावर नम्रता आलेली असते. समोरच्या रुममध्ये ती आणि मिनाक्षी अनूला खेळवत असतात. शरद आणि अशोक दोघेही टी.व्ही.वर क्रिकेटचा सामना पाहत असतात, तर काजल बिचारी एकटी स्वयंपाकघरात जेवण बनवत असते. अजयचा प्रसन्न चेहरा पाहून नम्रता आणखीच खूश होते. खूप दिवसांनी अजय, प्रसाद, अशोक, शरद हे चौघे एकत्र आलेले असल्याने प्रसादच्या घरी एखादा सण साजरा होतोय, असं वातावरण तयार झालं होतं. नंतर अनामिका अजयकडे खेळण्यासाठी जाते तेव्हा नम्रता आणि मिनाक्षी, दोघीही काजलला मदत करायला किचनमध्ये जातात. जेवण तयार होतं. सगळे जमिनीवरच जेवायला बसतात. नम्रताला हे सगळं नवीनच असतं. ती म्हणते,

"हे काय आहे?"

अजय, "ही भारतीय पध्दत आहे जेवणाची."

प्रसाद, "काही प्रॉब्लेम असेल तर काजलच्या रुममधून खुर्ची आणतो. नम्रताला टेबलावर बसवतो जेवायला."

नम्रता, "हॅलो, प्रसाद. मला काही प्रॉब्लेम नाहीये."

प्रसाद, "सॉरी, आमच्या घरात..."

अजय त्याला अडवत, "ए पॅडी बंद कर आता. शांतपणे जेवायला बस."

सगळे जेवायला बसतात. प्रसाद आणि अजय एकमेकांकडे बघतात, आणि नजरेने एकमेकांना विषय काढायला सांगतात. दोघांनाही काही सूचत नाही, विषय कसा काढावा? सर्वांचं जेवण आटोपतं. जेवणानंतर प्रसाद, अशोक, अजय आणि शरद शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघतात. घरापासून काही दूर चालत गेल्यानंतर अजय त्याच्या खिशातून सिगारेटचं पाकिट काढतो आणि तिघांना सिगारेट ऑफर करतो. तिघेही नाही म्हणतात. अजय एकटा सिगारेट घेतो.

प्रसाद, "नुसती सिगारेट घेणार आहेस की आपलं मुद्याचं सुध्दा बोलणार आहेस?"

अजय सिगारेटचा धूर बाहेर फेकत, "अशोक, शरद..."

अशोक - शरद त्याच्याकडे मान वळवून, "हा!"

अजय, "मी आणि पॅडीने आपल्या ऑस्ट्रेलियन कपलबाबत विचार केला तेव्हा त्या दोघांना न बोलावण्यातच सगळ्यांचं भलं आहे असं आम्हाला वाटतं."

शरद, "आता काय झालं?"

अजय, "अभीसोबत जे काही झालं, त्यावरुन तो इथे येईल असं वाटतं का तूला? आणि गौरीचा राग तर तू ओळखतोच."

अशोक, "पण तुम्ही दोघे असं कसं ठरवता? एकदा ट्राय करायला काय हरकत आहे?"

अजय, "भाई, गुजरात, केरळ, तामिळनाडू ठिक होतं. मी स्वतः तुम्हा सगळ्यांना घेऊन गेलो असतो. पण हे दोघे आऊट ऑफ इंडिया आहेत. भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट लागतो. आहे का तुमच्याकडे?"

तिघेही नकारार्थी मान हलवतात.

अजय, "जे आहे त्यातच आपण समाधान मानूया. ते दोघे आपल्या आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिण म्हणून होते हे आपण कधी विसरु शकत नाही. देवाची इच्छा असेल तर ते दोघे नक्की इथे परत येतील."

शतपावली करत चौघे नंतर इतर विषयावर गप्पा मारू लागतात. वरवर तरी चौघांनी तो विषय सोडून दिला होता, पण एखादी गोष्ट तेव्हाच घडून येते जेव्हा आपण ती गोष्ट घडण्याचा ध्यास मनाशी पक्का करतो. अगदी तसाच काहीसा प्रकार बदमाश ग्रुपबाबत होत होता. अभिजीत आणि गौरी जर्मनीला गेल्यामुळे स्टिफन ऑफिसमध्ये जास्तच काम करु लागला होता. अभिजीत हा मूळतः ऑस्ट्रेलियन नसल्याने त्याच्या भुतकाळाविषयी स्टिफनला प्रचंड उत्सूकता होती. पण, भूतकाळाच्या कोणत्याही आठवणीचा पुरावा अभिजीतने त्याच्या वर्तमानात काळजीपूर्वक ठेवला नव्हता. उत्सुकतेपोटी अभिजीतच्या अनुपस्थितीत त्याच्या भूतकाळाबाबत थोडीफार माहिती मिळविण्याचा प्रयत्न स्टिफन करतो. प्रथमतः तो अभिजीतचा खासगी कंप्युटर पूर्णतः तपासून पाहतो. मग गुगलवर पुन्हा एकदा सर्च करतो. इथेही ‘झिरो रिझल्ट’. मग तो एक कल्पना लढवतो. ऑफिसमधलं सर्व काम झाल्यावर तो अभिजीतच्या घरी जातो. तिथे रुपाली, सेरेना आणि प्रेस्तिका सिनेमा पाहत असतात.

रुपाली, Any problem sir? "काही काम होतं का सर?"

स्टिफन, Yes, are you disturbed as I come here without information? "हो. तसा तुम्हाला काही त्रास तर नाही ना मी आलो म्हणून?"

रुपाली, No Sir. Prestica and Serena are my close friends. "नाही सर, प्रेस्तिका आणि सेरेना माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत." मग ती स्टिफनची ओळख आपल्या मैत्रिणींबरोबर करुन देते.

स्टिफन, Ok then, all our officers' detailed information has to be sent to Head Office. So I try to contact Abhi, but I could not connect him. "बरं ऐक, आमच्या ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती हेड ऑफिसला पाठवायला सांगितली आहे. त्यासाठी मी अभिजीतला फोनसुध्दा केला होता. पण त्याचा फोन लागत नव्हता."

रुपाली, I am giving my sister's number, try to contact on it. "मी तुम्हाला ताईचा नंबर देते. तिच्या फोनवर ट्राय करा."

स्टिफन, No, Both they have gone out of country for the after settle down in Austrilia. Why should disturb them? I wan’t normal information, you can also tell me. "नको. ऑस्ट्रेलियाला आल्यापासून ते दोघे पहिल्यांदाच देशाबाहेर गेलेत. त्यांना कशाला त्रास द्यायचा? नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे. तू सुध्दा सांगू शकतेस."

रुपाली, Ok. Please ask. "बरं, विचारा."

स्टिफन, Where Abhijit was born? "अभिजीतचा जन्म कुठे झाला?"

रुपाली, In India "भारतामध्ये." स्टिफनला आनंदाचा सुखद धक्का बसतो.

स्टिफन, Yes, but where in India? "हो. पण भारतामध्ये कुठे?" आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवत तो बोलतो.

रुपाली, In Nashik "नाशिकला."

स्टिफन, Nashik? Got it. What is his qualification? "नाशिक? गॉट इट. बरं त्याचं शिक्षण काय?"

रुपाली, He completed B.Sc., then Degree in Programming. "त्यांनी बी.एस्.सी. केलं. मग प्रोग्रामिंगमध्ये डिग्री केली."

स्टिफन, Ok! Any work experience? "अच्छा! कामाचा काही अनुभव?"

ह्या प्रश्नाला मात्र रुपाली दचकते, नक्की काय माहिती द्यायची स्टिफनला? गोंधळलेल्या अवस्थेत ती सेरेना आणि प्रेस्तिकाला जरा बाहेर जायला सांगते. मग स्टिफनला विचारते, Sir, All these things are officially? "सर, तुम्ही खरंच हे सगळं ऑफिशीयल विचारताय?"

स्टिफन सुध्दा गडबडतो, Yes, his data is available in the head office. The number of googles members are rapidily increasing day to day so, for the prompt service it is necessary to do this. "हो, त्याचा डेटा हेड ऑफिसमध्ये आहे. आणि गुगलच्या मेंबर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी असं करावं लागतंय."

Sorry, if you feel bad, but without his permission don’t ask me about his past. I can show some photos for your information. "सॉरी, तुम्हाला वाईट वाटेल, पण त्यांच्या पास्टबद्दल त्यांच्या परवानगीशिवाय मला काही विचारु नका. तुम्ही कुणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला त्यांचे काही जूने फोटो दाखवू शकते."

फोटो दाखवते म्हटल्यावर स्टिफनला थोडं बरं वाटतं. तरीही जूने फोटो पाहून हाती सापडणार तरी काय? आता आलो आहोत तर कमीत कमी फोटो तरी पाहून जाऊ, असा विचार करुन स्टिफन रुपालीसोबत स्टडी रुममध्ये जातो. तिथे रुपाली तिचा कंप्युटर चालू करते आणि स्टिफनला बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगते. कंप्युटर चालू झाल्यानंतर स्टिफनचे डोळे पुर्णतः स्क्रिनसोबत एकरुप होऊन जातात. ती तीन-चार वेळा रिफ्रेश करते. अँटिव्हायरस अपडेट उपलब्ध असल्याने ती ‘अपडेट’ बटनवर क्लिक करते. मग माय कंप्युटर वर क्लिक करते. तिथून हार्ड डिस्क ड्राईव्हवर क्लिक करते. विव्ह नावाच्या मेनूमध्ये जाऊन सिक्युरिटी पासवर्ड टाकते. त्यानंतर तिने लपवलेले काही फोल्डर्स दिसू लागतात, जे तिच्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती पाहू शकत नाही. मग ती ‘बेस्ट मुव्हमेंट्स’ नावाचं फोल्डर उघडते. त्यात अभिजीत, अजय, अशोक, गौरी, शरद, प्रसाद, वृषाली, सागर, काजल, सुवर्णा, रुपाली, मिनाक्षी ह्या नावांची फोल्डर्स दिसतात. ती अभिजीत नावाचं फोल्डर उघडते. त्यात अजयने टिपलेले अभिजीतचे काही फोटो असतात. त्यापैकी ती एक फोटो उघडते.

डोळ्यावर काळा गॉगल, किंचीतशी दाढी वाढलेली, मिशी तर नव्हतीच, लांब केस, केशरी रंगाची हाफ फॅन्सी टी-शर्ट आणि त्यावर हिरवट काळ्या रंगांचा हाफ जॅकेट, त्यावर वेगवेगळे स्टिकर्स लावलेले, एक हात संपूर्ण गोंदलेला आहे असं दर्शविणारं टॅटू, फॅन्सी जिन्स, पायात स्पोर्टस् शूज घातलेले, हातात काळे हॅंडग्लोव्हज घातलेला, माईक पकडून स्टेजवर थोडा तिरकस उभा असलेला अभिजीत, त्याच्या पाठीमागे शरद गिटार घेऊन आणि अशोक ड्रम्स वाजवतोय. तिघांच्याही चेहऱ्यावरुन संगीत ओसंडून वाहत होतं. फोटोमध्येच अभिजीतची गाण्याची एकाग्रता आणि तळमळ दिसून येत होती. तिघांव्यतिरिक्त पाठीमागे स्पॉट बॉईज होते. स्टिफन तो फोटो पाहून चक्रावूनच जातो. साधारण पाच-दहा मिनीटे फोटो पाहिल्यानंतर तो रुपालीला म्हणतो,

You suppose to show me the photos of Abhijeet. Whose photos are these? Where is Abhijeet in this photos? "तू मला अभिजीतचे फोटो दाखवणार होतीस. हे कुणाचे फोटो दाखवतेस? या फोटोमध्ये अभिजीत कुठेय?"

रुपालीला हसू येतं. This is his photo. "हा फोटो त्यांचाच आहे." आपलं हसू आवरत ती म्हणते.

स्टिफन इतका चक्रावून जातो की फक्त तो बेशुध्द होऊन पडायचाच बाकी असतो. तो हे मानायलाच तयार नाही की रुपाली दाखवत असलेला फोटो हा अभिजीतचा आहे. थोडंफार साम्य लक्षात आल्यानंतर तो रुपालीच्या हातून माऊस हिसकावून घेतो. अभिजीतचे सगळे फोटो एक-एक करुन बघतो. कधी गाणे गाताना, कधी प्रेक्षकांनी उचलून धरलेलं असताना, कधी गाडीच्या टपावर बसलेला, कधी बागेत झोपून सुंदर अशी स्माईल देताना, तर कधी नदीच्या पाण्यात उडी मारत असताना. असे अनेक फोटो स्टिफनच्या डोळ्यासमोरून पुढे जात राहतात. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, अभिजीत खरंच इतका गोड हसू शकतो. तेव्हाच्या आणि आताच्या अभिजीतमध्ये इतका फरक कसा? तो रुपालीकडे वळून तिला विचारतो,

स्टिफन, Is he Abhijeet? Really? "खरंच हा अभिजीत आहे?"

रुपाली होकारार्थी मान हलवते !

स्टिफन, "हा अभिजीत आहे?" एवढं बोलून तो स्वतःशीच हसायला लागतो.

रुपाली, "Are you okey sir?"

स्टिफन, Rupali, my daughter, please tell me something about his past. This information is not needed for office purpose. I want this information for myself. He is my close friend, but I don’t know his past, I purposely came here to know something from you. Tell me in your language, I can understand your language. "रुपाली, माय डॉटर, प्लीज मला अभिजीतच्या भुतकाळाबद्दल काहीतरी सांग. ऑफिसला याबाबत काहीही माहिती नको. खरंतर मला त्याची माहिती पाहिजे होती. माझा जवळचा मित्र असून देखील त्याचा भुतकाळ मला माहित नाही, म्हणून मुद्दाम मी तुला असं विचारायला आलो. तू तुझ्या मातृभाषेत सांग, मी समजू शकतो."

स्टिफनच्या बोलण्यातून, त्याच्या आवाजावरुन रुपालीला त्याच्या मित्रत्वाच्या भावनेवर विश्वास बसला. ती त्याला सगळं सांगणार इतक्यात तिच्या मनात एक वेगळाच विचार आला. जर स्टिफन खरंच अभिजीतचा भुतकाळ जाणू इच्छित असेल, तर त्याला स्वतः माहिती मिळवायला सांगते. म्हणजे नकळत तोच अभिजीत आणि गौरीची त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा भेट घडवून आणू शकेल.

रुपाली, "ताई आणि जीजूंचं लव्ह मॅरेज होतं. म्हणून त्यांच्या पास्ट बद्दल मला तेवढी देखील माहिती नाही. पण तुम्ही ताईला आणि जीजूंना चुकूनसुध्दा त्यांच्या पास्ट बाबत विचारणा करु नका. त्यामुळे खूप वाद होतील. मागे मी सुध्दा त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा खूप भांडणं झाली होती. एक काम करते. तुम्हाला काही फोटो कॉपी करुन देते आणि यांच्या सगळ्यांच्या नावाची फाईल तुम्हाला देते. म्हणजे तुम्हाला माहिती मिळवायला मदत होईल. फक्त ताई आणि जीजूंना सांगू नका की, मी हे सर्व दिलंय हे."

स्टिफन तिला वचन देतो आणि तिच्याकडून मिळवलेली माहिती घेऊन आपल्या घरी जातो. अभिजीतचा तो वेगळा चेहरा सदैव त्याच्यासमोर येत असतो. रात्री सगळे झोपलेले असताना त्याला मात्र झोप येत नाही. बाल्कनीमध्ये असलेल्या आरामखुर्चीवर बसून तो विचार करु लागतो, आपल्यासमोर सतत कामाच्या ताणाखाली जगणारा आपला मित्र अभिजीत आयुष्यात इतका आनंदी जीवन जगत होता. मग नक्की काय झालं असेल त्याच्या त्या आनंदी दिवसांना? कुणाची नजर लागली असेल त्याला? कामाशिवाय कशातही रस नसलेला, तो चक्क गायक होता? इतका प्रसिध्द आणि लोकप्रिय होता की, त्याला सगळे खांद्यावर उचलून घेत? इतकं चांगलं आयुष्य जगत असताना नक्की काय झालं असेलं? अशी कोणती मोठी आपत्ती आली असेल? ज्यामुळे त्याला भारताबाहेर ऑस्ट्रेलियाला यावं लागलं? आणि त्या दिवशी तर तो क्रिकेटबद्दल भारताच्या विरुध्द बोलत होता. पाच वर्ष होऊन देखील त्याला भारतात जावंसं का वाटलं नसेल? त्याचे आई-वडील भारतात राहत असतील तर, तो त्यांना कधी भेटायला का नाही गेला? नाहीतर त्याने त्या सर्वांना इथे का नाही बोलावलं? प्रेमविवाह असला तरी काय झालं, एकदमच सर्व नाती, करीयर, देश सर्वस्व सोडून दुसऱ्या देशात तो आला ते नक्की काय साध्य करण्यासाठी? गुगलवर त्याने स्वतःला का ब्लॉक करुन घेतलं असेल? नाही, मला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवावीच लागतील. त्याशिवाय मला शांत झोप येणारच नाही. उद्याच सकाळी ऑफिसमध्ये जाऊन त्याचा कंप्युटर पुन्हा एकदा चाळून पाहतो.

हे देवा, नक्की काय झालं असेल माझ्या मित्राच्या आयुष्यात? त्याच्यामध्ये इतका बदल का घडला असेल? अभिजीतला फोन लावून जरा त्याच्यासोबत बोलतो. त्याचा आवाज ऐकून झोप तरी लागेल मला, असं बोलून स्टिफन अभिजीतला फोन लावतो.

जर्मनीमध्ये अभिजीत हॉटेलमध्ये गौरीसोबत गॅलरीत बसून बाहेरचा नयनरम्य निसर्ग आपल्या नजरेत कैद करत असतात. फोन वाजतो.

स्टिफन, Hello, Abhijeet? "हॅलो, अभिजीत?"

अभिजीत, Yes, Stee tell me, is there Any problem? "हा बोल स्टी. काही प्रॉब्लेम आहे का?"

स्टिफन, There are so many problems, if noticed. "तसं पहायला गेलं तर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत."

अभिजीत, Ok, I am connecting with you via internet from my Hotel. "माझी काही गरज लागेल का? मी हॉटेलमधून नेट ऑन करतो."

स्टिफन, No, nothing to tell you. "नाही. तसं तूला सांगण्यासारखं नाहीये."

अभिजीत, I don’t understand. "मी समजलो नाही."

स्टिफन, Abhijeet, I am facing some critical problems. But I don’t know how to solve it and what is the reason behind it. Can I solve it? "अभिजीत, खूप विचित्र गुंतागुंत माझ्यासमोर आली आहे. ती कशी सोडवू आणि त्याचं नक्की रहस्य काय आहे याचा मला शोध घ्यायचा आहे. मी ते रहस्य शोधू शकतो का?"

अभिजीत, Absolutely, You are so advanced. I am sure, you can solve any problem. "नक्कीच. तू तेवढा अॅडव्हान्स आहेस. तू कोणतंही सोल्युशन नक्कीच काढू शकतोस."

स्टिफन, Ok, Thanks, I just want to hear that from you. "बस्स. एवढंच ऐकायचं होतं मला."

अभिजीत, If any problems arise, you can contact me. "तरीही काही अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकतोस."

स्टिफन, "ओ.के. बाय."

अभिजीत, "बाय."

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात