Get it on Google Play
Download on the App Store

श्री कर्कटेश्वर महादेव


श्री कर्कटेश्वर महादेवाच्या स्थापनेची कहाणी राजा धर्ममूर्ती आणि मागील जन्मातील त्याची खेकडा योनी आणि मुक्ती यांच्यास्शी संबंधित आहे. प्रस्तुत कथेत चांगली कर्म आणि शिवालायाचे महात्म्य दर्शवलेले आहे. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी एक धर्ममूर्ती नावाचा प्रतापी राजा होऊन गेला. देवराज इंद्राच्या साथीने त्याने कित्येक दैत्यांचा संहार केला होता. तो तेजस्वी राजा इच्छेनुसार आपले शरीर धारण करू शकत होता, आणि कायम युद्धात विजयी होत असे ज्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. त्याची पत्नी भानुमती ही त्याच्या दहा हजार राण्यांपैकी श्रेष्ठ होती आणि सदा धर्म पारायण राहत होती. पूर्ण वैभव, कीर्ती आणि सुख यांनी परिपूर्ण असलेल्या राजाने एकदा महर्षी वसिष्ठ यांना विचारले की मला कीर्ती आणि उत्तम लक्ष्मी स्त्री कोणत्या कृपेने, कोणत्या पुण्याने प्राप्त झाली आहे?


उत्तरादाखल वसिष्ठ मुनी म्हणाले की पूर्व जन्मी तू शुद्र राजा होतास आणि कित्येक दोषांनी युक्त असा होतास. तुझी ही स्त्री देखील दुष्ट स्वभावाची होती. जेव्हा तू देहत्याग केलास तेव्हा तुला नरकात जावे लागले आणि तिथे कित्येक यातना सहन कराव्या लागल्या. त्या यातना सहन केल्यानंतर यमाने तुला खेकड्याचा जन्म दिला आणि तू महाकाल वनात रुद्रसागरात राहू लागलास. महाकाल वनातील रुद्र सागरात जो कोणी मनुष्य जप, तप, दान इत्यादी करतो त्याला अक्षय पुरी प्राप्त होते. ५ वर्ष तू तिथे राहिलास, आणि जेव्हा तू बाहेर आलास, तेव्हा एक कावळा तुला आपल्या चोचीत घेऊन आकाशात उडाला. तेव्हा सुटका करून घेण्यासाठी तू त्याच्या पायांवर प्रहार केलेस ज्यामुळे तू त्याच्या चोचीतून सुटलास. तिथून सुटून तू स्वर्गद्वारेश्वर च्या पूर्वेला असलेल्या दिव्य शिवालीन्गाजवळ पडलास आणि तिथे पडताच त्या दिव्य लिंगाच्या प्रभावाने तू आपला खेकड्याचा देह त्यागून दिव्य विद्याधरासमान देह प्राप्त केलास. नंतर जेव्हा तू शिवगणात सामील होऊन स्वर्गाकडे निघाला होतास तेव्हा देवतांनी शिवगणाना तुझ्याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी देवताना सर्व वृत्तांत सांगितला आणि या शिवलिंगाचे नाव कर्कटेश्वर महादेव असे प्रसिद्ध झाले. त्याच शिवलिंगाच्या प्रभावाने तुला आधी स्वर्ग प्राप्ती आणि नंतर राज्य प्राप्ती झाली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून राजा त्वरेने महाकाल वनात गेला आणि तिथे जाऊन शिवालीन्गासमोर लीन झाला.
मान्यता आहे की जो कोणी मनुष्य कर्कटेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याचे योनी दोष नष्ट होतात आणि तो शिवलोकात जातो. वर्षातील बाराही महिने इथे दर्शन घेता येते परंतु चतुर्दशी आणि अष्टमीच्या दिवशी इथे दर्शनाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले श्री कर्कटेश्वर महादेव मंदिर खटिकवाडा इथे उभे आहे