Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री खंडेश्वर महादेव

श्री खंडेश्वर महादेवाचे मंदिर शिव महात्म्य याच्या मूल्यांचे दर्शन घडवते. असे मानले जाते की खंडेश्वर महादेवाच्या दर्शनाच्या सहाय्याने विष्णू, ब्रम्हा, इंद्र, कुबेर, अग्नी इत्यादी देवतांनी देखील सिद्धी प्राप्त केली होती.
पौराणिक कथांनुसार त्रेतायुगात भद्राश्व नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या कित्येक राण्या होत्या. त्याच्या राण्यांमध्ये सर्वात अद्भुत असे सौंदर्य राणी कान्तिमती हिचे होते. एकदा त्यांच्याकडे महामुनी अगस्ती आले आणि म्हणाले की मी इथे ७ दिवस वास्तव्य करणार आहे. राजाने त्यांचे वास्तव्य म्हणजे स्वतःचे मोठे भाग्य आहे असे समजले आणि त्यांचा याथोचित आदर सत्कार केला.  कान्तिमती हिला पाहून अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या अगस्ती मुनींना काही जुन्या रहस्यमय गोष्टी समजल्या आणि ते अतिशय प्रसन्न झाले. त्यांना अत्यानंद झाला आणि ते नृत्य करू लागले. तेव्हा राजाला फार आश्चर्य वाटले आणि त्याने मुनींना विचारले की ऋषी, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा एवढा आनंद झाला आहे ज्यामुळे तुम्ही असे नृत्य करता आहात? तेव्हा ऋषी म्हणाले की तुम्ही सगळे मूर्ख आहात जे माझा अभिप्राय समजून घेऊ शकत नाही आहात. तेव्हा राजा भद्राश्वने ऋषींना हात जोडून नमस्कार केला आणि विनंती केली की हे रहस्य तुम्हीच कृपया उलगडून आम्हाला सांगा.


तेव्हा ऋषी म्हणाले की राजा, पूर्व जन्मात विदिशा नावाच्या ठिकाणी वैश्य हरिदत्त याच्या घरी तुझी ही पत्नी कान्तिमती दासीचे कार्य करत होती, आणि तू तिचा पती होतास आणि तू देखील नोकराचे काम करत होतास. तो वैश्य ज्याच्याकडे तुम्ही दोघे काम करत होतात, मोठा महादेव भक्त होता. तो नित्य नेमाने महादेवाची उपासना करत असे. एकदा तो महाकाल वनात आला आणि त्याने महादेवाचे पूजन केले.
काही काळानतर तुम्हा दोघांचा मृत्यू झाला, परंतु त्या विषयाच्या भक्तीच्या प्रभावाने तुला या जन्मात हे राजवैभव प्राप्त झाले आहे. मुनुंचे बोलणे ऐकून राजा महाकाल वनात गेला आणि इथे येऊन त्याने एक दिव्य शिवलिंग खंडेश्वर महादेवाचे दर्शन पूजन केले. त्याच्या पूजन आणि उपासनेमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला निष्कंटक राज्य उपभोगण्याचे वरदान दिले.
असे मानले जाते की खंडेश्वर महादेवाच्या दर्शनाने अद्भुत सिद्धी प्राप्त होतात आणि पूर्वजन्मीच्या पापांचा विनाश होतो. असे देखील मानले जाते की श्रावण महिन्यात खंडेश्वर महादेवाच्या दर्शनाचे महत्त्व कितीतरी पटींनी वाढते. श्री खांदेश्वर महादेवाचे मंदिर आगर रोड वर खिलचीपूर गावात वसलेले आहे.