Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री मुक्तेश्वर महादेव

श्री मुक्तेश्वर महादेवाचा महिमा मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. स्वयं तेजस्वी जितेंद्रिय ब्राम्हण देखील १३ वर्ष तप केल्यानंतर महाकाल वनात येऊनच मोक्षाचा मार्ग प्राप्त करू शकला होता. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी एक मुक्ती नावाचा जितेंद्रिय ब्राम्हण होता. मुक्तीच्या इच्छेने तो सतत तपश्चर्या करण्यात लीन असे. असेच तप करत १३ वर्षे गेली. मग एक दिवस तो महाकाल वनात असलेल्या अतिशय पवित्र अशा क्षिप्रा नदीत स्नान करण्यासाठी गेला. क्षिप्रा नदीत त्याने स्नान केले आणि मग तिथेच तटावर बसून तप करण्यास प्रारंभ केला. तेव्हा त्याने तिथे एका प्रचंड आणि भीषण देहाच्या मनुष्याला येताना पहिले. त्याच्या हातात धनुष्य बाण होते. तिथे पोचल्यावर तो मनुष्य ब्राम्हणाला म्हणाला की मी तुला मारायला आलो आहे. त्याचे बोलणे ऐकून बेम्हन अतिशय घाबरला आणि भगवान नारायणाचे स्मरण करत ध्यान लावून बसला. ब्राम्हणाच्या तपाच्या भव्य प्रतापाने त्या मनुष्याने धनुष्य बाण खाली टाकले आणि ब्राम्हणाला म्हणाला, महाराज तुमच्या तपाच्या प्रभावाने माझी बुद्धी निर्मळ झाली आहे. मी आतापर्यंत खूप दुष्कर्म केली आहेत, परंतु आता मला तुमच्यासोबत राहून तप करून मुक्ती प्राप्त करायची आहे. ब्राम्हणाच्या परवानगीची वाट न पाहताच तो मनुष्य तिथे बसून देवाचे ध्यान करू लागला. त्याच्या तपाचे फळ म्हणून त्याला मुक्ती मिळाली. हे पाहून ब्राम्हणाला आश्चर्य वाटले की मी इतकी वर्षे ध्यान करतो आहे आणि मला मात्र मुक्ती मिळाली नाही. असा विचार करून ब्राम्हण नदीच्या पाण्यात मधोमध जाऊन तप करू लागला.काही दिवस तो तिथेच जप करत राहिला. तेव्हा तिथे एक वाघ आला, ज्याला त्या नदीच्या मध्ये असलेल्या ब्राम्हणाला खायचे होते. तेव्हा ब्राम्हणाने 'नमो नारायण' जप चालू केला. ब्राम्हणाच्या मुखातील नमो नारायण हे बोल ऐकताच त्या वाघाने आपला देह त्यागला आणि एका उत्तम पुरुषाच्या रुपात तो परावर्तीत झाला. ब्राम्हणाने विचारल्यावर त्याने सांगितले की पूर्व जन्मात तो दीर्घबाहू नावाचा प्रतापी राजा होता आणि सर्व वेदविद्या पारंगत होता. त्याला या गोष्टीचा गर्व होता आणि तो ब्राम्हणांना कमी लेखत असे. एकदा ब्राम्हणांचा अपमान केल्यामुळे ब्राम्हणाने त्याला शाप दिला की तू वाघ योनीत जाऊन कष्ट भोगशील. तेव्हा त्याने सर्व ब्राम्हणांची स्तुती केली आणि म्हटले की ब्राम्हण महाराज, मला तुम्हा सर्वांचे तेज समजले आहे. तुमच्या पैकीच एक अगस्ती मुनींनी जेव्हा समुद्राला गर्व झाला तेव्हा त्याला पिऊन खारट केले होते. त्याचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. ब्राम्हणाच्या शापामुळेच वातापि राक्षस नष्ट झाला. भृगु ऋषींच्या शापामुळे सर्वभक्षी अग्नी झाला. गौतम ऋषींच्या शापाने इंद्र सहस्त्रयोनी झाला. ब्राम्हणाच्या शापामुळे भगवान विष्णूंना देखील १० अवतार घ्यावे लागले. च्यवन मुनींच्या कृपेने देवतांचे वैद्य अश्विनी कुमारांना स्वर्गात सोमरस पिण्यास मिळाला. ब्राम्हणांची महती अशी गाताना तो वारंवार त्या ब्राम्हणांची क्षमायाचना करत राहिला.
त्याची प्रार्थना ऐकून ब्राम्हण प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की जेव्हा तू महाकाल वनात जाऊन तिथे क्षिप्रा नदीच्या मध्ये उभे असलेल्या ब्राम्हणाच्या मुखातून 'नमो नारायण' हे बोल ऐकशील, तेव्हाच तू या शापातून आणि त्याचबरोबर वाघ योनीतून देखील मुक्त होशील. अशा प्रकारे त्या ब्राम्हणाच्या मुखातून नमो नारायण ऐकून त्या राजाची मुक्तता झाली. तेव्हा ब्राम्हण त्या राजाला म्हणाला की मला मुक्ती कशी मिळेल? मला तप करत वर्षे लोटली तरीही मला अजूनही मुक्ती मिळाली नाही. तेव्हा राजा त्याला म्हणाला की तुम्ही कृपया महाकाल वनात जाऊन तिथे मुक्तिलिंगाचे दर्शन करावे. पुढे तो म्हणाला की मुक्तीलिंगाची महिमा केवळ सांगणाऱ्याला देखील मुक्ती मिळते. तेव्हा मग राजा आणि ब्राम्हण दोघ महाकाल वनात आले आणि त्यांनी मुक्तीलिंगाचे दर्शन घेतले. केवळ दर्शन घेतल्यानेच ते दोघेही शिवलिंगात सामावून गेले आणि त्यांना मुक्ती मिळाली.
मान्यता आहे की मुक्तेश्वरमहादेवाचे दर्शन घेतल्याने मुक्ती मिळते. या शिवलिंगाची पूजा ऋषी-मुनी-देवता हे सर्व देखील करतात. उज्जैन मधील ८४ शिवा मंदिरातील एक असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर खत्रीवाडा इथे वसलेले आहे.