Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री मेघनादेश्वर महादेव


श्री मेघनादेश्वर महादेवाच्या स्थापनेची कथा पुण्य कर्मांची महती आणि दोषांचे दुष्परिणाम यांच्याकडे संकेत करते. राजाचे दोष आणि दुष्कर्म यांच्यामुळेच वर्षा बाधित झाली.
पौराणिक कथांनुसार एकदा द्वापार युग आणि कलियुग यांच्या संधीवर मदांध नावाचा एक अहंकारी राजा होऊन गेला. राजा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा होता. राजाचे दोष आणि दुष्कर्म यांच्यामुळे राज्यात १२ वर्ष पाऊस पडला नाही. त्याच्यामुळे नद्या सुकून गेल्या, तलाव नाहीसे झाले, यज्ञ वगैरे सर्व बंद पडले. पृथ्वीवर सगळीकडे नुसता हाहाःकार मजला


 हे पाहून इंद्रादी देवता क्षीरसागर च्या उत्तरेला श्वेतदीपावर भगवान जनार्दनाकडे गेले. तिथे जाऊन त्यांनी ईश्वराला नमस्कार केला आणि त्यांची स्तुती गाऊ लागले. तेव्हा भगवंतानी विचारले की तुम्ही का आला आहात आणि तुमची इच्छा काय आहे? तेव्हा देव म्हणाले की प्रभू, अनेक वर्ष वृष्टी झाली नाहीये, काहीतरी उपाय करा.  देवांचे गाऱ्हाणे ऐकून जनार्दन काही काळ ध्यान लावून बसले आणि नंतर देवांना सांगितले की तुम्ही कृपया महाकाल वनात जावे. तिथे प्रतिहारेश्वर च्या ईशान्य कोनात एक दिव्य शिवलिंग आहे ज्याच्यात वृष्टी करणारे मेघ राहतात. तुम्ही सर्व तिकडे जा आणि भक्तिभावाने त्या शिवलिंगाचे दर्शन पूजन करा. त्यांचे पूजन केल्याने नक्कीच वृष्टी होईल. भगवंतांचे बोलणे ऐकून सर्व देवता महाकाल वनात गेले आणि त्यांनी त्या दिव्या लिंगाची भक्तिभावाने स्तुती गायली आणि पूजा केली. त्याचे फळ म्हणून त्या शिवालीन्गातून कित्येक मेघ प्रकट झाले आणि त्यांनी आकाशात जाऊन वृष्टी करायला सुरुवात केली. संपूर्ण सृउष्टी पुन्हा संतुलित झाली आणि पृथ्वीवरील सर्व जीव जंतू, पक्षी, प्राणी तसेच मानवाचा संताप सूर झाला. देवणी त्याला अमृतवर्षा मानले. आणि अतिशय प्रसन्न होऊन त्यांनी या शिवलिंगाचे नाव मेघनादेश्वर महादेव ठेवले.
असे मानले जाते की मेघनादेश्वर महादेवाचे पूजन केल्याने वृष्टी मध्ये वृद्धी होते. असे म्हटले जाते की इथे दर्शन पूजन केल्यामुळे पितरांना शांती मिळते. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले श्री मेघनादेश्वर महादेवाचे मंदिर छोटा सराफा इथे नृसिंह मंदिराच्या मागे उभे आहे.