Get it on Google Play
Download on the App Store

श्री पत्त्नेश्वर महादेव


श्री पत्त्नेश्वर महादेवाचा महिमा स्वतः भगवान शंकरांनी तसेच महर्षी नारदांनी गायले आहे, स्कंद पुराणात याचे वर्णन आहे. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वताच्या एका गुहेत विहार करत होते. तेव्हा पार्वतीने शंकराला म्हटले कि, प्रभू, जिथे स्फटिक मणी लागलेला आहे, जो अनेक प्रकारची फुले आणि केवड्याच्या वनांनी सुशोभित आहे, जिथे सिद्ध - गंधर्व - चारण - किन्नर इत्यादी उत्तम गायन करतात, ज्याला पुण्य लोकांची उपमा प्राप्त आहे, असा मनोरम कैलास पर्वत तुम्ही का सोडलात? आणि असा सुंदर रमणीय कैलास पर्वत सोडून तुम्ही त्या हिंस्र पशूंनी भरलेल्या महाकाल वनात का वास्तव्य करता आहात?
उत्तरात भगवान शंकर म्हणाले, मला अवंतिका नागरी आणि महाकाल वन हे स्वर्गापेक्षा देखील सुखद वाटते. इथे पाचही गुण - स्मशान, शक्तीपीठ, तीर्थक्षेत्र, वन आणि उशर आहेत. इथे गीत, वाद्य, चातुर्य यांची इतकी स्पर्धा आहे की स्वर्ग लोकवाले देखील ते ऐकण्याला उत्सुक असतात. असे स्थान तिन्ही लोकात नाही.
तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. त्यांना पाहून शंकराने विचारले, महर्षी, तुम्ही कोणकोणत्या तीर्थ स्थळांचे भ्रमण करून आला आहात? त्यातील कोणते स्थान तुम्हाला सर्वांत रमणीय वाटले? नारद मुनी म्हणाले की मी असेक तीर्थ क्षेत्रांची यात्रा केली, परंतु त्यांच्यात अत्यंत मनोहर, अत्यानंत विचित्र असे महाकाल वन आहे. तिथे मनोकामना पूर्ण होण्याबरोबरच उत्तम सुखाची प्राप्ती होते. तिथे नेहमीच फुलांचा बहर असतो आणि सुख देणारा वारा वाहत राहतो. तिथे मधुर संगीत दरवळत राहते. उरध लोक, अधो लोक, सप्त लोक यांचे लोक तिथे पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी वास्तव्य करून असतात. तिथे स्वतः भगवान शंकर पत्त्नेश्वर महादेवाच्या रुपात राहतात.
असे मानले जाते की पत्त्नेश्वर महादेवाचे दर्शन पूजन केल्याने मृत्यू, वार्धक्य, रोग इत्यादी वाढी आणि त्यांची भीती समाप्त होते. श्रावण महिन्यात इथे दर्शनाचे विशेष महत्त्व आहे. श्री पत्त्नेश्वर महादेव खिलचीपूर मध्ये पिलिया खाल च्या पुलावर वसलेले आहे.