Get it on Google Play
Download on the App Store

सरदार व त्याचा घोडा

एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोड्याच्या खाण्यापिण्याविषयी फार काळजी घेत असे. पुढे काही दिवसांनी लढाई संपली व त्या सरदाराचा पगार कमी झाला, त्यामुळे तो आपल्या घोड्याला अगदी निष्काळजीपणे वागवू लागला. ज्या घोड्याने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठ्या शौर्याने आपल्या पाठीवर नेले होते त्याच घोड्याला तो आता मोठमोठी लाकडे वाहून नेण्याच्या कामाला लावू लागला. शिवाय त्याची काळजी घेईनासा झाला. त्यामुळे घोडा अशक्त होत चालला. पुनः एकदा लढाई सुरू झाल्याची बातमी आली असता सरदाराला लढाईवर जाण्याचा हुकूम आला. सरदार घोड्याची काळजी घेऊ लागला, तो शक्तीशाली व्हावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली, पण घोड्याला त्याचे ओझे उचलण्याची ताकद नसल्याने तो वरचेवर अडखळू लागला. मग तो घोडा सरदाराला म्हणाला, 'तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस. माझ्या पाठीवर लाकडं लादून नि माझं खाणं तोडून तू मला घोड्याचा गाढव बनवलंस. अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीसारखा तुझ्या उपयोगी पडेनासा झालो तर त्यात माझ्याकडे दोष नाही.'

तात्पर्य

- एखाद्या प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवायचे व जरुरीच्या वेळी मात्र त्याची फार काळजी घ्यायची हे हितकारक नाही.

इसापनीती कथा १०१ ते १५०

इसाप
Chapters
मधमाशा आणि त्यांचा धनी लांडगा आणि बगळा कुत्रा आणि सिंह कोळी आणि चिमणी कोल्हा आणि साळू कोल्हा आणि कावळा कोल्हा आणि करकोचा गरुडपक्षीण आणि कोल्हीण गाढवाचे पोर आणि रानडुक्कर डोमकावळा देवाकडे राजा मागणारे बेडूक बोकड आणि बैल अविचारी शेतकरी शेतकरी आणि दैव Tउंदीर आणि बेडूक समुद्र किनार्‍यावरील प्रवासी पारवा आणि तसबीर लांडगा आणि कोकरू लांडगा आणि मेंढी कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडा आणि रत्‍न किडा आणि खोकड खेकडा आणि त्याचे पोर कावळा आणि कबुतरे पायाला साखळी बांधलेला कावळा कबुतर आणि कावळा हंस आणि बगळा गिधाड आणि त्याचे पाहुणे गावठी गाढव आणि रानगाढव गरुड आणि घुबड गाढव व कुत्रा गाढव आणि बेडूक धीट कुत्रा धनगर आणि त्याच्या मेंढ्या देव आणि माकड दैव आणि मुलगा दैव आणि गावंढळ मनुष्य चिलट आणि सिंह बगळे आणि राजहंस बाभळ आणि सागवान अस्वल व कोल्हा बैल आणि बोकड बैल आणि चिलट चित्ता आणि कोल्हा दोघे वाटसरू व अस्वल उंदीर, कोंबडा व मांजर तरुण आणि त्याचे मांजर सिंह आणि तीन बैल शेतकरी व गरुड बहिरी ससाणा व कोंबडा ससा आणि कुत्रा सरदार व त्याचा घोडा समुद्र आणि नद्या साळू आणि साप मेंढ्या व कुत्रे माणूस व मुंगूस मांजरे व उंदीर