गाढवाचे पोर आणि रानडुक्कर
एकदा एका रानडुकराला एक गाढवाचे पोर रानात भेटले. तेव्हा ते गाढव चेष्टेने रानडुकराला म्हणाले, 'रामराम हो भाऊ रामराम !'
गाढवाचे ते सलगीचे बोलणे ऐकून डुकर खूप चिडले. परंतु आपला राग आवरून ते म्हणाले,
'हे हलक्या प्राण्या तू आपल्या वाटेने जा. तुला ठार मारण्यासाठी मला एक क्षणही वेळ लागणार नाही. परंतु गाढवाच्या रक्ताने माझे तोंड विटाळण्यास मी तयार नाही.'
तात्पर्य
- मूर्ख लोक स्वतःस फार शहाणे समजून मोठ्यांची चेष्टा करायला जातात परंतु मोठे लोक मात्र त्यांना सोडून देतात हे यांचे सुदैवच म्हटले पाहिजे.