धनगर आणि त्याच्या मेंढ्या
एकदा एका धनगराला वाटले आपल्या मेंढ्यांना बाभळीच्या शेंगा खाऊ घालाव्यात. म्हणून तो आपले धोतर झाडाखाली ठेवून, झाडावरून शेंगा आणि पाला खाली टाकू लागला. ते खात असताना त्यातील काही मेंढ्या त्याचे धोतरही खाऊ लागल्या. ते पाहून वरून धनगर म्हणाला, 'अरे, इतरांना तुम्ही कपड्यांसाठी तुमची लोकर देता पण मी जो तुमचा मालक त्याचं धोतर मात्र तुम्ही खाऊन टाकता ? हा किती कृतघ्नपणा !'
तात्पर्य
- भुकेच्या वेळी आपण काय करतो आहोत याची शुद्ध प्राणिमात्रांना रहात नाही.