बोकड आणि बैल
एक खोडकर बोकड एका नांगराला जुंपलेल्या बैलाला म्हणाला, 'तू किती दुर्दैवी आहेस ! दिवसभर हे जू मानेवर घेऊन तू कष्ट करतोस. जन्मभर तू असाच गुलामगिरीत राहाणार आहेस का? मी बघ बरं कसा मनाला वाटेल तिथे हिंडतो. खातो पितो !'
बैलाने यावर काही उत्तर दिले नाही. परंतु संध्याकाळी जेव्हा तो बैल काम संपवून घरी जात होता तेव्हा त्याच बोकडाला बळी देण्यासाठी चालवलेले त्याला दिसले. तेव्हा तो बैल त्या बोकडाला म्हणाला, 'आता सांग बरं माझी स्थिती चांगली की तुझी?'
तात्पर्य
- दुसर्याला संकटात सापडलेले पाहून हसणारा मनुष्य स्वतःही संकटात सापडू शकतो.