पहाटेच्या भूपाळ्या
१
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां मना न पुरे धणी ॥१॥
देखिला देखिला मायें देवांचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी ।
बापरखुमादेवीवरु खुण बाणली कैसी ॥३॥
२
अवतारची राशी तो हा उभा विटेवरी ।
शंखचक्रगदापदम्सहित करीं ॥१॥
देखिला देखिला देवाधिदेव बरवा ।
समाधान जीवां पाहतां वाटे गे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज तेज पुंजाळती ।
वंदुनी चरणरज नामा विनवितसे पुढती ॥३॥
३
करुनि विनवणी पायीं ठेवितो माथा ।
परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावें ऐसें वाटतें पायीं ।
साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरिराया ॥३॥
तुका म्हणे आम्ही तुझी वेडीं वाकुडीं ।
नामें भवपाश हातें आपुल्या तोडी ॥४॥
४
माझे चित्त तुझे पायीं । राहे ऐसें करी कांही ।
धरोनियां बाही । भव हा तारी दातारा ॥१॥
चतुरा तूं शिरोमणी । गुणलावण्याची खाणी ।
मुकुट सकळां मणी । धन्य तूंचि विठोबा ॥२॥
करी या तिमीराचा नाश । उदय होऊनि प्रकाश ।
तोडी आशा पाश । करी वास हृदयीं ॥३॥
पाहें गुंतलों नेणतां । माझी असो तुम्हां चिंता ।
तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥४॥
५
ऐसी वाट पाहे कांही निरोप कां मूळ ।
कां हो कळवळा तुम्हां उमटेचिना ॥१॥
अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे ।
लावोनियां आसे चाळवुनि ठेविलें ॥२॥
काय जन्मा येऊनियां केली म्यां जोडी ।
हाचि घडीघडी चित्तां येतो आठव ॥३॥
हाचि म्हणे खरा न पविजे विभाग ।
धिक्कारितें जग हाचि लाहें हिशोब ॥४॥
६
बोलोनियां दाऊं कां तुम्ही नेणाजी देवा ।
ठेवाल ते ठेवा तैसा राहेन ॥१॥
पांगुळलें मन कांही नाठवे उपाय ।
म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥२॥
त्याग भोग दु:ख काय सांडावे मांडावें ।
ऎसी धरियेली जीवें माझ्या थोर आशंका ॥३॥
तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनीं ।
न पवतां जननी दु:ख पावें विठठले ॥४॥
७
कां गा केविलवाणा केलो दिनाचा दीन ।
काय तुझी हीन शक्ति झालीसे दिसे ॥१॥
लाज वाटे मना तुझा म्हणवितां दास ।
गोडी नाहीं रस बोलिलिया सारिखी ॥२॥
लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें ।
कळो येतें खरें दुजें एकावरूनी ॥३॥
तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ।
प्रसादावांचुनि तुमचिया विठठला ॥४॥
८
जळो माझें कर्म वाया केली कटकट ।
झालें तैसें तट नाहीं आलें अनुभवा ॥१॥
आतां पुढें धीर काय देऊं या मना ।
ऎसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥२॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठीं ।
माझें मज पोटीं बळकट दूषण ॥३॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा ।
बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥४॥
९
जळोत तीं येथें उपजवितीं अंतराय ।
सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आतां मज साह्य येथें करावें देवा ।
तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी ॥२॥
भोगें रोगा जडोनियां दिलें आणिका ।
अरुचि ते हो कां आता सकळांपासूनी ॥३॥
तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकीं ।
नाही ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥
१०
न सांगतां तुम्हां कळों येतें अंतर ।
विश्वीं विश्वंभर परीहारचि नलगे ॥१॥
परि हें अनावर आवरितां आवडी ।
अवसान तें घडी पुरों एकी देत नाहीं ॥२॥
काय उणें मज येथें ठेवलिये ठायीं ।
पोटा आलें तई पासुनियां समर्थे ॥३॥
तुका म्हणे अवधी आवरली वासना ।
आतां नारायणा दुसरियापासूनी ॥४॥
११
तुजसवें आम्ही अनुसरलें अबळा ।
नको अंगीं कळा राहो हरीहीन देऊं ॥१॥
सासुरवासा भितो जीव ओढें तुजपाशी ।
आतां दोहींविषीं लज्जा राखे आमुची ॥२॥
न कळतां संग झाला सहज खेळतां ।
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी ॥३॥
तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें ।
वचन या भावें वेंचूनियां विनटलों ॥४॥
१२
कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख ।
बहु वाटें दु:ख फुटों पाहे ह्रदय ॥१॥
कां गा सासुरवासी मज केलें भगवंता ।
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥२॥
प्रभातेसीं वाटे तुमच्या यावें दर्शना ।
येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥३॥
येथें अवघे वायां गेले दिसती सायास ।
तुका म्हणे नास दिसे झाला वेंचाचा ॥४॥
१३
तुझें दास्य करुं आणिका मागों खावया ।
धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आतां म्हणावें ।
शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या नांवें ॥२॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भलें परि काय अवकळा ऎसी ॥३॥
तुझा शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे लाज कवणा हें कां नेणसी ॥४॥
१४
चित्तिं तुझें पाय डोळां रूपाचें ध्यान ।
अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेंचि एक तुम्हां मागतों मी दातारा ।
उचित तें करा भाव जाणोनि खरा ॥२॥
खुंटली जाणीव कांही बोलणेंचि आतां ।
कळों येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्हणे आतां नका देऊं अंतर ।
न कळे पुढें काय कैसा होईल विचार ॥४॥
१५
वाट पाहें बाहें निढळीं ठेवूनियां हात ।
पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥
कई येतां देखेन माझा मायबाप ।
घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥२॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे ।
मन उतावीळ भाव सांडुनियां देहे ॥३॥
सुख सेज गोड चित्ति नलगे आणिक ।
नाठवे घरदार तहान पळाली भूक ॥४॥
तुका म्हणे धन्य ऎसा दिवस तो कोण ।
पंढरीचे वाट येतां मूळ देखेन ॥५॥
१६
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥१॥
दिन तैसी रजनी झाली वो माये ।
अवस्था लाऊनि गेला अझुनि कां नये ॥२॥
गरुडावाहना गंभीरा येई गा दातारा ।
बापरखुमादेवीवरा श्रीविठठला ॥३॥
१७
पैल विळाचिये विळ आंगणीं उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे विठठल केउता गे माये ॥१॥
पायरऊ झाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनीं देवकीनंदनु गे माये ॥३॥
बापरखुमादेवीवरु जीवींचा जीवनु ।
माझें मनींचें मनोरथ पुरवी कमलनयनु ॥४॥
१८
येतिया पुसें जातिया धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥
येई वो येई वो विठाबाई माउलिये ।
निढळावरी कर ठेऊनि वाट पाहे ॥२॥
पिंताबर शेला कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिवाळी ।
विष्णुदास नाम जीवें भावें ओवाळी ॥४॥
१९
येई वो येई वो येई धांवोनिया ।
विलंब कां वाया लावियला कृपाळे ॥१॥
विठाबाई विश्वंभरें भवच्छेदके ।
कोठें गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥
न करी न करी आतां आळस अव्हेरु ।
व्हावया प्रकट कैचे दूरी अंतरु ॥३॥
नेघे नेघ नेघे माझी वाचा विसावा ।
तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥४॥
२०
देखिले तुमचे चरण निवांत राहिलें मन ।
कासया त्यजीन प्राण आपुला हे माये ॥१॥
असेन धरणीवरी आपलें माहेरी ।
मग तो श्रीहरी गीतीं गाईन गे माये ॥२॥
सकळही गोत माझें पंढरीस जाण ।
बापरखुमादेविधरा श्रीविठ्ठलाचि आण ॥३॥
२१
आतां कोठें धावें मन ।
तुमचे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला शीण गेला ।
अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मीठि ।
आवडी लाठी मुखासी ॥३॥
तुका म्हणे आम्हां जोगे ।
विठ्ठल घोगें खरें माप ॥४॥
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां मना न पुरे धणी ॥१॥
देखिला देखिला मायें देवांचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी ।
बापरखुमादेवीवरु खुण बाणली कैसी ॥३॥
२
अवतारची राशी तो हा उभा विटेवरी ।
शंखचक्रगदापदम्सहित करीं ॥१॥
देखिला देखिला देवाधिदेव बरवा ।
समाधान जीवां पाहतां वाटे गे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज तेज पुंजाळती ।
वंदुनी चरणरज नामा विनवितसे पुढती ॥३॥
३
करुनि विनवणी पायीं ठेवितो माथा ।
परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावें ऐसें वाटतें पायीं ।
साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरिराया ॥३॥
तुका म्हणे आम्ही तुझी वेडीं वाकुडीं ।
नामें भवपाश हातें आपुल्या तोडी ॥४॥
४
माझे चित्त तुझे पायीं । राहे ऐसें करी कांही ।
धरोनियां बाही । भव हा तारी दातारा ॥१॥
चतुरा तूं शिरोमणी । गुणलावण्याची खाणी ।
मुकुट सकळां मणी । धन्य तूंचि विठोबा ॥२॥
करी या तिमीराचा नाश । उदय होऊनि प्रकाश ।
तोडी आशा पाश । करी वास हृदयीं ॥३॥
पाहें गुंतलों नेणतां । माझी असो तुम्हां चिंता ।
तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥४॥
५
ऐसी वाट पाहे कांही निरोप कां मूळ ।
कां हो कळवळा तुम्हां उमटेचिना ॥१॥
अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे ।
लावोनियां आसे चाळवुनि ठेविलें ॥२॥
काय जन्मा येऊनियां केली म्यां जोडी ।
हाचि घडीघडी चित्तां येतो आठव ॥३॥
हाचि म्हणे खरा न पविजे विभाग ।
धिक्कारितें जग हाचि लाहें हिशोब ॥४॥
६
बोलोनियां दाऊं कां तुम्ही नेणाजी देवा ।
ठेवाल ते ठेवा तैसा राहेन ॥१॥
पांगुळलें मन कांही नाठवे उपाय ।
म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥२॥
त्याग भोग दु:ख काय सांडावे मांडावें ।
ऎसी धरियेली जीवें माझ्या थोर आशंका ॥३॥
तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनीं ।
न पवतां जननी दु:ख पावें विठठले ॥४॥
७
कां गा केविलवाणा केलो दिनाचा दीन ।
काय तुझी हीन शक्ति झालीसे दिसे ॥१॥
लाज वाटे मना तुझा म्हणवितां दास ।
गोडी नाहीं रस बोलिलिया सारिखी ॥२॥
लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें ।
कळो येतें खरें दुजें एकावरूनी ॥३॥
तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ।
प्रसादावांचुनि तुमचिया विठठला ॥४॥
८
जळो माझें कर्म वाया केली कटकट ।
झालें तैसें तट नाहीं आलें अनुभवा ॥१॥
आतां पुढें धीर काय देऊं या मना ।
ऎसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥२॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठीं ।
माझें मज पोटीं बळकट दूषण ॥३॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा ।
बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥४॥
९
जळोत तीं येथें उपजवितीं अंतराय ।
सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आतां मज साह्य येथें करावें देवा ।
तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी ॥२॥
भोगें रोगा जडोनियां दिलें आणिका ।
अरुचि ते हो कां आता सकळांपासूनी ॥३॥
तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकीं ।
नाही ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥
१०
न सांगतां तुम्हां कळों येतें अंतर ।
विश्वीं विश्वंभर परीहारचि नलगे ॥१॥
परि हें अनावर आवरितां आवडी ।
अवसान तें घडी पुरों एकी देत नाहीं ॥२॥
काय उणें मज येथें ठेवलिये ठायीं ।
पोटा आलें तई पासुनियां समर्थे ॥३॥
तुका म्हणे अवधी आवरली वासना ।
आतां नारायणा दुसरियापासूनी ॥४॥
११
तुजसवें आम्ही अनुसरलें अबळा ।
नको अंगीं कळा राहो हरीहीन देऊं ॥१॥
सासुरवासा भितो जीव ओढें तुजपाशी ।
आतां दोहींविषीं लज्जा राखे आमुची ॥२॥
न कळतां संग झाला सहज खेळतां ।
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी ॥३॥
तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें ।
वचन या भावें वेंचूनियां विनटलों ॥४॥
१२
कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख ।
बहु वाटें दु:ख फुटों पाहे ह्रदय ॥१॥
कां गा सासुरवासी मज केलें भगवंता ।
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥२॥
प्रभातेसीं वाटे तुमच्या यावें दर्शना ।
येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥३॥
येथें अवघे वायां गेले दिसती सायास ।
तुका म्हणे नास दिसे झाला वेंचाचा ॥४॥
१३
तुझें दास्य करुं आणिका मागों खावया ।
धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आतां म्हणावें ।
शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या नांवें ॥२॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भलें परि काय अवकळा ऎसी ॥३॥
तुझा शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे लाज कवणा हें कां नेणसी ॥४॥
१४
चित्तिं तुझें पाय डोळां रूपाचें ध्यान ।
अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेंचि एक तुम्हां मागतों मी दातारा ।
उचित तें करा भाव जाणोनि खरा ॥२॥
खुंटली जाणीव कांही बोलणेंचि आतां ।
कळों येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्हणे आतां नका देऊं अंतर ।
न कळे पुढें काय कैसा होईल विचार ॥४॥
१५
वाट पाहें बाहें निढळीं ठेवूनियां हात ।
पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥
कई येतां देखेन माझा मायबाप ।
घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥२॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे ।
मन उतावीळ भाव सांडुनियां देहे ॥३॥
सुख सेज गोड चित्ति नलगे आणिक ।
नाठवे घरदार तहान पळाली भूक ॥४॥
तुका म्हणे धन्य ऎसा दिवस तो कोण ।
पंढरीचे वाट येतां मूळ देखेन ॥५॥
१६
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥१॥
दिन तैसी रजनी झाली वो माये ।
अवस्था लाऊनि गेला अझुनि कां नये ॥२॥
गरुडावाहना गंभीरा येई गा दातारा ।
बापरखुमादेवीवरा श्रीविठठला ॥३॥
१७
पैल विळाचिये विळ आंगणीं उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे विठठल केउता गे माये ॥१॥
पायरऊ झाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनीं देवकीनंदनु गे माये ॥३॥
बापरखुमादेवीवरु जीवींचा जीवनु ।
माझें मनींचें मनोरथ पुरवी कमलनयनु ॥४॥
१८
येतिया पुसें जातिया धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥
येई वो येई वो विठाबाई माउलिये ।
निढळावरी कर ठेऊनि वाट पाहे ॥२॥
पिंताबर शेला कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिवाळी ।
विष्णुदास नाम जीवें भावें ओवाळी ॥४॥
१९
येई वो येई वो येई धांवोनिया ।
विलंब कां वाया लावियला कृपाळे ॥१॥
विठाबाई विश्वंभरें भवच्छेदके ।
कोठें गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥
न करी न करी आतां आळस अव्हेरु ।
व्हावया प्रकट कैचे दूरी अंतरु ॥३॥
नेघे नेघ नेघे माझी वाचा विसावा ।
तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥४॥
२०
देखिले तुमचे चरण निवांत राहिलें मन ।
कासया त्यजीन प्राण आपुला हे माये ॥१॥
असेन धरणीवरी आपलें माहेरी ।
मग तो श्रीहरी गीतीं गाईन गे माये ॥२॥
सकळही गोत माझें पंढरीस जाण ।
बापरखुमादेविधरा श्रीविठ्ठलाचि आण ॥३॥
२१
आतां कोठें धावें मन ।
तुमचे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला शीण गेला ।
अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मीठि ।
आवडी लाठी मुखासी ॥३॥
तुका म्हणे आम्हां जोगे ।
विठ्ठल घोगें खरें माप ॥४॥