प्रसंग 10
( अण्या, तिऱ्या व पक्या हे तिघे टपोरी मंडळाचे कार्यकर्ते त्या मोहनच्या गाड्याजवळ येतात.)
पक्या:- भैय्या! किधरसे आया रे तू.
भैय्या:- जी दादा यूपीवरून.
अण्या:- अरे व्वा, ये तो मराठी बोलत है बबुआ.
( तिऱ्या व पक्या हसतात.)
तिऱ्या:- चल अब वापस कल्टी मार.
मोहन:- म्हणजे?
पक्या:- म्हणजे घर लौट जाने का. किधर...? यूपी रिटर्न समझा.
मोहन:- अरे ऐसा कैसा चला जा
पक्या:- आपल्यावर आवाज. ए धर ह्याला पटकन.
( लगेच तिघे मिळून मोहनला मारायला चालू करतात. नंतर मारून झाल्यावर मोहन आडवा पडलेला असतो. हा प्रसंग संपला.)