प्रसंग 6
( शेजारचे नवरा बायको रघू आणि चंपा यांच छोटसं भांडण सुरू असतं)
चंपा:- आवो जरा कामधंदा नीट करत जा.
रघू:- तू नको मेरे को सांगू.
चंपा:- मी नाय बताएगी तो कौन बताएगा फिर
रघू:- जाने दे, चाय दे जरा मेरे को.
चंपा:- हां जवा बघा तवा मस्का... नुसता चाय.
रघू:- लाती क्या?
चंपा:- हां आणते. तुम्हाला
अक्कलच नाय जरा बी.
रघू:- मेरी अक्कल नको काढू.
चंपा:- जान देवो, मै भी किसके मुह लग रही.
रघू:- ( जोरात उठतो आणि चंपाला मारायला रागाने आत पळतो. चंपा आत जोरात निघून जाते.)
( हा प्रसंग इथेच संपतो.)