Get it on Google Play
Download on the App Store

साधूचा हिरा

एकदा एका जंगलात एक साधू पर्णकुटी बनवून राहत होते.त्या साधूंकडे एक मौल्यवान हिरा होता. याच जंगलात एक दरोडेखोरही राहत होता. एके दिवशी दरोडेखोरला कळले की साधूंकडे एक मौल्यवान हिरा आहे.  तेव्हा त्याने ठरवले की मी साधुना त्रास न देता हिरा मिळवून देईन. त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, पण तो अयशस्वी ठरला.

काय करावे असा विचार करत असताना एका मित्राने त्या  दरोडेखोराला साधूचा वेष परिधान करून साधूंकडे  जाण्याचा सल्ला दिला.

दरोडेखोराने तसेच केले. तो एका साधूच्या रूपात त्या महान साधूंच्या पर्णकुटीत गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, "महाराज, मला आपला शिष्य बनवा."

साधूंनी त्या दरोडेखोराला आपल्या पर्णकुटीत राहण्यासाठी जागा दिली. साधू जेव्हा जेव्हा पर्णकुटीच्या बाहेर जात असत, तेव्हा तेव्हा दरोडेखोर त्यांच्या वस्तूंमध्ये हिरा शोधत असे; पण कित्येक दिवस झाले तरी त्याला हिरा काही सापडला नाही.

त्याने खूप शोध घेतला आणि अखेर, एक दिवस त्याने साधूंना सांगितले, "महात्माजी, मी भिक्षु नाही. मी हिरा चोरून नेण्यासाठी आलो होतो आणि साधू असल्याचे ढोंग करत होतो.मी खूप शोधला....."

हे ऐकून साधू  हसले आणि म्हणाले, ".....पण हिरा सापडला नाही. वत्सा, जेव्हा जेव्हा मी बाहेर जायचो, तेव्हा मी हिरा तुझ्या पलंगाखाली  ठेवायचो. तू नेहमी हिरा माझ्या पलंगाखाली आणि माझ्या सामानात पहायचास पण तुझा अंथरूण तू कधी पाहिले  नाहीस. अगदी अशाच प्रकारे जगातील सर्व लोकही परमात्म्याचा शोध बाहेर शोधतात परंतु तर परमात्मा अंतर्मनात वास करत असतो."

त्या दिवसापासून दरोडेखोराने साधूला आपला गुरु बनवून घेतले