Get it on Google Play
Download on the App Store

संतांची महानता

एक राजा होता. त्याच्या मनात संतांसाठी खूप आदर होता. एकदा त्याच्या राज्यात एक महान संत आले . राजाने आपल्या सेनापतीला त्या संताना आदराने दरबारात आणण्याचे आदेश दिले. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने एक सुसज्ज रथ संतांकडे पाठवला.

राजाच्या आमंत्रणाबद्दल थेट बोलण्या अगोदर सेनापतीने नम्रपणे आपले डोके त्यांच्या पायावर टेकवले आणि नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर तो म्हणाला, "हे साधू, महाराजांचा प्रणाम स्वीकार करावा. आमच्या महाराजांनी आपणासाठी रथ पाठवला आहे. जर तुम्ही तुमच्या पायाची धूळ राजवाड्यात झाडून त्यांचे निवासस्थान पवित्र करू शकाल, तर तो एक मोठा आशीर्वाद असेल." संतांनी राजवाड्यात येणे मान्य केले.

 

ते संत उंचीने खूपच बुटके होते. त्यांना पाहून सेनापतीला हसू आले. आणि त्यांनी विचार केला की त्याच्या उंच आणि बलवान राजाला खुज्या व्यक्तीशी कोणत्या प्रकारची चर्चा करायची आहे? सेनापतीच्या हसण्याचे कारण संतांना लगेचच लक्षात आले.

मग संतांनी त्याला हसण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, "कृपया क्षमा करा. पण खरं सांगायचं तर मी तुमची बुटकी मूर्ती पाहून हसलो  कारण आमचे महाराज खूपच उंच आहेत, आपल्याला त्यांच्याशी बोलण्यासाठी सिंहासनावर चढून जावे लागेल.

त्याचे हे शब्द हे ऐकून संत हसले आणि म्हणाले," काळजी करू नका, मी जमिनीवर असतानाच तुमच्या महाराजांशी बोलेन. आणि  माझ्या कमी उंचीचा फायदा असा होईल की जेव्हा मी बोलेन तेव्हा मी डोके वर करून बोलेन आणि माझी मान ताठ असेल.  पण जेव्हा तुमचे महाराज माझ्याशी बोलतील तेव्हा त्यांना मस्तक झुकवून माझ्याशी बोलावे लागेल कारण ते उंच आहेत.

 

सेनापतीला आपली चूक लगेच उमगली आणि त्याने संतांची क्षमा मागितली.

तात्पर्य

श्रेष्ठत्व नेहमी चांगल्या विचारांमधून येते. विचार चांगले आणि ज्ञानपूर्ण असतील तरच व्यक्ती खऱ्या अर्थाने महान बनते आणि संपूर्ण समाजासाठी वंदनीय होते.