Get it on Google Play
Download on the App Store

देव कुठे आहे?

एकदा एका नास्तिक विद्यार्थ्याने एका साधूंना विचारले, "महाराज, देव कुठे आहे?

साधू म्हणाले, "देव प्रत्येकामध्ये आहे."

इतक्यात तिकडे एक पिसाळलेला हत्ती पळताना दिसला. त्याच्या मागे पळणारा माहुत ओरडत होता,

"बाहेर जा, हत्ती वेडा आहे."

साधू लगेच बाजूला झाले. पण तो नास्तिक विद्यार्थी मात्र  तसाच  रस्त्यावर उभा राहिला आणि साधूंचे शब्द आठवून विचार करू लागला की जेव्हा प्रत्येकामध्ये देव असेल, तेव्हा हा हत्तीमध्येही असेलच.

पिसाळलेला हत्ती जिज्ञासूकडे पळत पळत आला आणि त्याने त्याच्या सोंडेने त्या विद्यार्थ्याला उचलला आणि झुडपात भिरकावून दिला. त्याला खूप दुखापत झाली.

हत्ती निघून गेल्यानंतर जेव्हा साधू त्याच्याजवळ गेले आणि त्याची विचारपूस करू लागले.

तेव्हा त्याने नास्तीकपणे विचारले, "महाराज, तुम्ही तर सांगितले होते की देव प्रत्येकामध्ये आहे, मग असे का झाले? देव हत्तीमध्ये पण होता तरी त्याने माझ्यासारख्या निरपराधावर हल्ला का केला?”

साधू म्हणाले, " देव त्या माहुतामध्ये पण होता, जो हत्तीच्या मागे पळत ओरडून सांगत होता की हत्ती वेडा आहे. तू त्याचे का ऐकले नाहीस? "

साधूंचे हे शब्द ऐकून नास्तिक विद्यार्थी निरुत्तर झाला.