Get it on Google Play
Download on the App Store

आई बदलतेय

आई आता दिसत नाही सतत

कळकट मळकट धुडक्यात

दिवसभर कामाच्या रगाड्यात

आई आता मस्त जीन्स टॉप घालतेय

आई आता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढतेय

कारण आई आता बदलतेय ।


आई आता बसत नाही चुलीपुढे

लाकडं फुंकून फुंकून डोळे लाल करत

आई आता स्मार्ट किचन मध्ये

नवं नव्या रेसिपी बनवते

कंटाळा आला तर चक्क स्विगीचे

पार्सल मागवतेय

खरचं आई आता बदलतेय ।


आई आता पसरत नाही बाबांकडे हात छोट्या छोट्या गरजांसाठी

आणि खात नाही सासूचा आणि नवऱ्याचा मार

उलट आई आता बाबांच्या खांद्याला खांदा लावून कमावतेय

हो खरंच आई आता बदलतेय ।


आई आता रडत नाही जुन्या दिवसांचे गाऱ्हाणे

सासवा नणंदा जावांचे ते घेत नाही उखाणे

ती आता म्हणत नाही बाईचा जन्म खोटा

उलट मुलाला पराठे अणि मुलीला कराटे शिकवतेय

हो खरचच आई आता बदलतेय ।


आई आता हसतेय , नाचतेय ,

मनासारखे जगतेय ,

काळाप्रमाणे बदलतेय ,

आवडेल तसंच वागतेय