Android app on Google Play

 

बायका फार हळव्या असतात

 

https://sharechat.com/post/Q7m1Eje

बायका फारच हळव्या असतात

भडाभडा बोलतात

घळाघळा रडतात

खुदकन हसतात

पटकन रुसतात

आपल्या घराला जिवापाड जपतात

बायका फारच हळव्या असतात


शब्द जिवास लावून घेतात

ओठांना शिवून घेतात

बोलायचं ते बोलत नाही

मनातलं सांगत नाही

हवा पाणी ,मुलंबाळं,घरदार ह्यांची आवड..स्वयंपाकपाणी...नवे पदार्थ...

नको नको ते विषय काढून 

नको तेव्हढं बोलत जातात .

आतली सल दडवत जातात

बायका फार हळव्या असतात.


दुखलं खुपलं सांगत नाही

नको तेव्हढं सोसत जातात

वर पुन्हा

कुणीच दखल घेत नाही

म्हणत रडत कुढत जातात

कुणाला नसलं बरं..

पदर खोचून सिध्द होतात

औषधपाणी खाणंपिणं 

निगुतीने देत जातात

आई होतात,दाई होतात,सखीसारखं जपत जातात.

किती झिजतेस माझ्यसाठी...शब्द ऐकण्यास आतूर असतात.

तिचे कष्ट गृहीत धरून कोणीच काही बोलत नाही

आपली कोणास किंमत नाही ..

सल सलच जातो

वाटते तिला फुलं देऊन

माझ्यावाट्यास काटेच असतात

बायका फार हळव्या असतात.


प्रेम जेव्हा करतात ना

तेव्हा जिवापाड करतात

आभाळ होतात

धरणी होतात

पौर्णिमेचा चंद्र होतात

चांदण्याची शीतलता

सागराची अथांगता

झ-याची निर्मळता

जीवनाला ऊर्जा देत

सदैव झिजत असतात

बायका फार हळव्या असतात


घराची शान असतात

कुटुंबाचा प्राण असतात

त्यांच्याशिवाय घराच्या भिंती खचतात छप्पर उडते

त्यांचा हात फिरला की घराचा स्वर्ग होतो

प्रेम करतात जिवापाड

फक्त एका गोड शब्दासाठी आतुरलेल्या असतात

बायका फार हळव्या असतात


खंबीर असतात गंभीर असतात

प्रेमळ असतात अल्लड असतात

खर्च जरी केला तरी 

चार पैसे बाळगून असतात

जगण्याचा एक मंत्र सगळ्याच बायका जाणून असतात

नवरे जरी गप्प बसले तरी आतून प्रेमळ असतात

बायका सगळ्या हळव्या असतात.


आभाळाची सावली असतात

हिरवीगार पालवी असतात

माधवी बहर असतात

वसंतातली झुळूक असतात

बायका फार हळव्या असतात


- गजेंद्र अधिकारी