Get it on Google Play
Download on the App Store

बोलणं

'बोलण्याची शक्ती' हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. 

आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. 

तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! 

हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.


'आहे हे असं आहे', 

'माझा आवाजच मोठा आहे' 

'मला अशीच सवय आहे'

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.