Get it on Google Play
Download on the App Store

गरुड

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.


त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !


जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.

एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !


150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !


याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !


150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !


दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे

एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.