Android app on Google Play

 

उष:काल २

 

बहिस्थ:विद्यार्थी म्हणून प्रि डिग्री परीक्षेस बसलो ,अभ्यासात खंड पडू द्यावयाचा नाही
असे ठरवले.त्याच  दरम्यान विवाह झाला
१९६४ मध्ये,सर्व कुटुंब एकत्र भाऊ,
भावजय नोकरी करणारा एकटा आणि
पगार त्याकाळात रु.११०-०० परंतु तसा
पुरेसा होता.प्रि डिग्री पास झालो.नंतर
समजले की इंदोर येथील प्रथम वर्ष झाल्यावर पुणे येथील विद्यालयात तृतीय
वर्षात प्रवेश मिळतो.इंदोर येथील परीक्षा
दिली व पुणे विद्यालयात प्रवेश घेतला.
संसार ,नोकरी आणि अभ्यास म्हणजे
तारेवरची कसरत.रात्री जागून अभ्यास
करणे.१९६७ मध्ये सुनीता,कन्या हिचा
जन्म झाला.१९६९ मध्ये गजानन मुलगा
याचा जन्म झाला,व १९७३ सीमा,कन्या
हीच जन्म झाला.