Android app on Google Play

 

दादर येथील वास्तव्य

 

दादर येथे तो रेल्वे पोलीस म्हणून सुरवात
झाली.पगार रुपये ८० महिना.पैकी रुपये
४० घरी मतोश्रीस पाठवीत असे.खात्यात
ऑपरेटरच्या काही जागा भरावयाच्या होत्या. पण त्या करिता SSC म्हणजे अकरावी पास आवश्यक होते.मी तर आठवीतून शिक्षण सोडलेले.शिकण्याची
इच्छा होती.बहिस्थ अकरावी होता येते
हे समजले.तेथे रात्रीच्या शाळेत प्रवेश.
घेतला.नोकरी बारा तास.तरी पण जिद्द
होती.अभ्यास केला.केलेल्या प्रयत्नाला
यश आले.व मॅट्रिक ही पदवी मिळाली
खूप आनंद झाला.त्या मुळे अधिक प्रगती
करण्याची उमेद वाढली.दादरला दोन
वर्ष नोकरी केली.पण त्या नोकरीत मन
रमले नाही.त्याच काळात सकरवाडी येथे नवीन
हायस्कुल सुरू झाले होते तेथे लेखनिकाची
जागा भरावयाची होती.तेथे अर्ज केला.
दादर येथील नोकरी सोडली.