Get it on Google Play
Download on the App Store

नोकरीत बदल

वडिलांना पेन्शन मिळत होती.पेन्शन व सुधाकरचा पगार कसा बसा प्रपंच चालत
होता.वडील पेन्शन आणण्यास अकोल्यास
जात असत.पेन्शन आणण्यास अकोल्यास
गेले असता,वाशीम येथे गेले.कदाचित तिथे
असतांना प्रकृती बिघडली असावी. तेथून
ते कान्हेगाव,सकरवाडीस येण्यास रेल्वेने निघाले,कोणीतरी मनमाड स्टेशनवर त्यांना
उतरवून दिले.तिथेच बाकावर झोपून राहिले.तेथील स्टेशन मास्तर त्यांना ओळखत असल्याने,त्यांनी कान्हेगाव येथील
स्टेशन मास्तरला निरोप देण्यास सांगितले.सुधाकर त्याच्या मित्रांना घेऊन मनमाड रेल्वे स्टेशन
वर गेले,प्रकृती जास्त बिघडल्याने बोलू
शकत नव्हते,त्यांना विचारले मला ओळखले?ते म्हणाले हो तू सुधाकर आहेस
त्याना तेथील हॉस्पिटल मध्ये नेले पण उपयोग झाला नाही.तेथेच त्यांचा देहांत
झाला.तेथून त्यांना घरी आणले.
सुधाकरच्या डोक्यावरचे एक छत्र हरपले.