कॉलेज
रामानुजन कॉलेजमध्ये जायला लागला तेव्हाची गोष्ट! त्याच्या एका गणिताच्या प्राध्यापकांचं नाव रामानुजचरिअर असं होतं. बीजगणित किंवा भूमिती शिकवताना त्यांना नेहमीच दोन फळ्यांचा वापर करत. तसंच ते गणित सोडवताना किमान १० तरी पायर्या वापरून गणित सोडवायचे. रामानुजनला इतका वेळ चाललेलं ते गणित पाहून इतका कंटाळा यायचा, की त्याचा संयम संपायचा आणि तो तीन किंवा चार पायर्या झाल्या की लगेचच आपल्या जागेवरून उठायचा आणि प्राध्यापकांच्या हातातला खडू घेऊन तेच गणित फळ्यावर जास्तीत जास्त चार पायर्यांमध्ये सोडवून दाखवायचा. त्या प्राध्यापकांसहित सगळा वर्ग चकित होऊन एकदा फळ्याकडे तर एकदा रामानुजनकडे बघत राहायचा. नंतर मात्र वर्गाला आणि त्या प्राध्यापकांनाही रामानुजनच्या हस्तक्षेपाची इतकी सवय झाली होती की नवीन गणित शिकवताना, ते शिकवून झाल्यानंतर ते प्राध्यापक आधी रामानुजनकडे बघून 'बरोबर आलंय ना रे गणिताचं उत्तर?' असं म्हणून खात्री करून घेत असत. मग काय, विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनाही रामानुजन फारच ग्रेट वाटायचा. पण काही विद्यार्थ्यांना मात्र रामानुजनचं गणित गोंधळात पाडायचं. याचं कारण रामानुजन गणित सोडवताना इतका अधीर व्हायचा की गणिताच्या मधल्या अनेक पायर्या तो मनातल्या मनातच सोडवून मोकळा व्हायचा आणि निवडक पायर्या फळ्यावर सोडवून दाखवायचा. त्यामुळे उत्तर बरोबर असलं तरी ते कसं आलं हे काही केल्या त्यांना कळत नसे.
इ.स. १९३० मध्ये, १६ वर्षांचे असताना त्यांनी मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण केली. गणितात त्यांनी प्रथेम श्रेणी प्राप्त केली व त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे त्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयातही ते गणिते सोडवण्यातच तल्लीन होत व इतर विषयांकडे दुर्लक्ष करीत. याचा परिणाम असा झाला की, गणितात त्यंना पूर्ण गुण मिळाले; पण इतर विषयांत ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. यामुळे त्यांच्या वडिलांना वाईट वाटले. परिणामी, त्यांना महाविद्यालय सोडावे लागले. अशा प्रकारे इ.स. १९०६ साली त्यांचे औपचारिक शिक्षण समाप्त झाले.