Android app on Google Play

 

जयमंङगल अठ्ठगाथा

 

ज्या मुनींद्राने सुदृढ हत्यार धारण केलेल्या, सहस्रबाहु, गिरीमेख नावाच्या हत्तीवर आरूढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला व त्याच्या अफाट सेनेला आपल्या दान आदि धर्म बळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुक़ ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंअकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारझे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवादपरायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

ज्या मुनींद्राने, विविध महाॠद्धीसंपन्न, नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामोग्गलान शिष्या जडुन रिद्धि आणि उपदेशाच्या बलाने जिंकले, त्या तेजाने तुमचे कल्याण होवो...

ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्तिसंपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...