संघ वंदना
भगवन्ताचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे , हा संघ निमंत्रण देण्यास योग्य , स्वागत करण्यास योग्य , दक्षिणा देण्यास पात्र , तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे . असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे . मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे . ।।१।।
असा जो भूतकाळातील , भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे . त्या सर्वांना मी सदैव वन्दन करतो ।।२।।
मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही . बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे , ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।३।।
तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो . संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो . ।।४।।
ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही . याच्यामुळे माझे कल्याण होवो . ।।५।।
संघ विशुद्ध , श्रेष्ठ , दक्षिणा देण्यास योग्य , शान्त इन्द्रियांचा , सर्व प्रकारच्या अलिप्त , अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे . ह्या संघाला मी प्रणाम करतो .