महामंङल गाथा
महाकारुणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्याच्या हितकरीता दहा पारमिता पुर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.
शाक्य वंशाला आनंद देणाऱ्या भगवान बुद्धांनी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसुन मारेसेनेचा पराभव करुन विजय मिळवला, त्याचप्रमाणे तुमचे कल्याण होवो.
राग, द्वेष व मोहादी विकारावर देव व मनुष्याच्या कल्याणासाठी बुद्धरत्न या उत्तम औषधाचे सत्कारपुर्वक ग्रहण करावे, जेणे करुन या तेजोमय बुद्धरत्नाच्या प्रभावाने तुमचे कल्याण होवो. आणि सर्व दुःख व उपद्रव नाश पावतील.
चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम धर्मरत्न हे औषध आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्वभय शांत होवोत.
आमंत्रण व पाहुणचार करण्यास पात्र असलेले संघरत्न हे उत्तम औषध आहे. अशा तेजोमय संघाच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्व उपद्रव व रोग नष्ट होवोत.
विश्वात जी काही मौल्यवान रत्ने गणली जातातत्यात बुद्ध, धम्म व संघाची बरोबरी करणारे एकही अस्तित्वात नाही, ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.
बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याशिवाय अन्य दुसरे कोणतेही शरण-स्थान मला नाही. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.
तुमचे सर्व भय, वैर, रोग नष्ट होवोत. सर्व विघ्नबंधन संपुन तुम्हाला सुख व दीर्घायुष्य प्राप्त होवो.
सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने तुमचे मंगल होवो. सर्व देवता तुमचे रक्षण करोत आणि तुमचे कल्याण होवो.
जे वाईट निमित्त, अपशकुन, अप्रिय शब्द, पापग्रह, वाईट स्वप्न, ते सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने नष्ट होवोत..