प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ ...
प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ । उपटिलें मूळ कल्पनेचें ॥ १ ॥
गेली ते वासना निमाली भावना । चुकलें बंधना यमपाश ॥ २ ॥
उपजत मूळ खुंटलें तें जाळ । मायेचें पडळ हरपलें ॥ ३ ॥
निवृत्तिस्वानंद नित्यता आनंद । जग हा गोविन्द आम्हां पुरे ॥ ४ ॥