आम्हां जप नाम गुरुखूण सम ...
आम्हां जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना । एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प । साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥