गयनी गव्हार कृपेचा उद्धार...
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥