हरिविण न दिसे जनवन आम्हा ...
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखों तारांगणें । अवघा हरि होणें हेंचि घेवो ॥ २ ॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळीं । भरलासे गोपाळीं दुमदुमीत ॥ ३ ॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनीचा धाम गूजगम्य ॥ ४ ॥