विश्रामीचा श्रम आश्रम पैं...
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम । जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा । अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग । केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार । सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥