श्यामाची श्याम सेजवरी करी...
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्गुरुरे ॥ १ ॥
सद्गुरुवीण मूढासि दरुशन कैचें । ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥ २ ॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावें भूमीभारु ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वें दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥