नाहीं हा आकार नाहीं हा वि...
नाहीं हा आकार नाहीं हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
हरिरूप पै जप हरिहररूप । गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥
हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी । तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें । तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥