विश्वंभरमूर्ति विश्वाचे प...
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक । वैकुंठव्यापक जीवशिव ॥ १ ॥
तें रूप सुंदर नंदाघरीं वसे । जनीवनीं वसे कृष्णरूप ॥ २ ॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण । आनंदपुर्णघन गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार । भाग्य पारावार यशोदेचें ॥ ४ ॥