बिंबीं बिंबीं येक बिंबलें...
बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक । आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला । सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥
निळिमा अंबरीं निजवर्ण तेज । गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥
निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा । नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥