वैभव विलास नेणोनिया सायास...
वैभव विलास नेणोनिया सायास । कल्पनेची आस नाहीं जेथें ॥ १ ॥
तें रूप दुर्लभ कृष्णमूर्तिठसा । वोतल्या दशदिशा नंदाघरीं ॥ २ ॥
योगियांचे ध्यान मनाचें उन्मन । भक्तांचे जीवन गाई चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साकार ब्रह्मींचा प्रकार । ॐतत्सदाकार कृष्णलीला ॥ ४ ॥