तेथें नाहीं मोल मायाचि गण...
तेथें नाहीं मोल मायाचि गणना । आपण येसणा ब्रह्मघडु ॥१॥
तें रूप साजिरें निर्गुण साकार । देवकीबिढार सेवियेले ॥२॥
नसंपडे ध्याना मना अगोचर । तो गोपवेषधर गोकुळीं रया ॥३॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट । कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥४॥