आवडतो मज आवडतो
आवडतो मज आवडतो, मनापासुनी आवडतो
सहवास लागता गोड
का मना लागते ओढ
मज दर्शन होता त्याचे
मन वेडे होऊन नाचे
मळ्यात राही कधितरी अन् तो तळ्यात केव्हा सापडतो
कधी थकुनी त्याने यावे
मी हळूच कुरवाळावे
कधी येता त्याला रंग
अंगास घासतो अंग
दोस्त जिवाचा, चिंगलिंग चाचा, बैल लाडका आवडतो