आई व्हावी मुलगी माझी
आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई
सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी
आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई
'केस कोरडे कर ग पोरी', सात हात त्या जटा विंचरी
'नको पावडर दवडू बाई', कोकलते ही आई
शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी
लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई