दुर्गापूजा
दुर्गापूजा हा बंगाल मधील एक हिंदू सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्रीशी संबंधित सण आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत. बंगाल, बिहार, ओडीसा, आसाम,उत्तर प्रदेश या प्रांतात दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बंगाल प्रांतात त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष आहे. बंगाली लोकांचा तो वर्षातील महत्वाचा सणच आहे. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.