Get it on Google Play
Download on the App Store

नवरात्रातील नऊ माळा

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.

पहिली माळ

शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ

अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्‍या फुलांची माळ.

तिसरी माळ

निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी माळ

केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ

बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ

कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ

झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ

तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ

कुंकुमार्चन करतात.