जोगवा
कोल्हापूर येथील अंबाबाई
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारुड रचले आहे.ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी |
मोह महिषासुर मर्दना लागुनी ||
त्रिविध तापांची कराया झाडणी |
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी |
आईचा जोगवा जोगवा मागेन |
द्वैत सारुनी माळ मी घालीन |
हाती बोधाचा झेंडा घेईन |
भेदरहित वारिसी जाईन|
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा |
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा |
या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.
नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.