Get it on Google Play
Download on the App Store

आरती नंदलाला । व्रजवासी ग...

आरती नंदलाला । व्रजवासी गोपाला ॥

करी कंजवाणी लीला । भक्तिभाव फुलविला ॥ धृ. ॥

शिरी पिच्छ मयुरांचे कंठी रुळे वनमाळा ॥

सावळे रुप कैसे । मुग्ध करी जगताला ॥ १ ॥

भगवंत बालरुपे । आला नंदाचिया घरां ॥

बाल-गोपाल संगे । खेळे नाचे प्रेमभरा ॥ २ ॥

घुमे नाद मुरलीचा । जणु वाचा प्रेमाची ॥

हारवी देहबुद्धि । साद घाली भक्तीची ॥ ३ ॥

खूण ही अंतरीची । एक राधा उमगली ॥

गोविंद नाम घेतां । स्वये गोविंद झाली ॥ ४ ॥

सान, थोर भेद-भांव । विरलेची हरीनामी ॥

निरसेच मोहमाया । चित्त चैतन्य कामी ॥ ५ ॥

संकटीं रक्षी सर्वा । सान बाळ नंदाचे ॥

गणेश दास्य याची । नित हरि-चरणाचे ॥ ६ ॥

श्रीकृष्ण आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
जयदेव जयदेव वन्दे गोपालम्... अवतार गोकुळी हो । जन तारा... ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥ ... हरिनाम गोड झाले ॥ काय सा... येउन मानवदेहा भुललों संसा... कमलानन खगवाहन मणिभूण शौरी... श्रावणकृष्णाष्टमिसी गोकुळ... वांकी चरणीं धरणी रांगसि य... वृंदारकगुणवृंदं परमामृतकं... निरसुनि देहत्रय अंतरमंदिर... बंधु बलरामासह गोकुळीं अवत... रजनी करकुल सुंदर देखुनि अ... कोटि कुर्वंडिया माधवपायां... हरि चला मंदिरा ऎशा म्हणती... आरती भुवनसुंदराची । इंदि... सुमनाचे शेजेवरी । पहुडली ... परमानंदा परम पुरुषोत्तमा ... दैत्यभारें पिडली पृथिवी ब... कंसराये गर्भ वधियेले सात ... जय बासूरिया तूंते कृपाळा ... नंदयशोदाबाला कुटिलालकजाला... कंसवधार्य धरातल धरिली भक्... श्यामल वर्णा षड्रिपुदमना ... जयजयजी कृष्णनाथ रुक्मिणीव... प्रभुवर जय जय जय देव गीत ... निर्गुण सगुणाकारं सह्रतभ ... कुंददंत मंदहासय नंदनंदना ... करुणाकर गुणसागर गिरिवर धर... आरती कुंजबिहारीकी । गिरिध... कोण शरण गेले विधि त्रिपुर... आरती नंदलाला । व्रजवासी ग... श्रीकृष्ण गोविंद गोपाळ रा...