Android app on Google Play

 

इडली स्टाईल ढोकळे (आणि मूगडाळ चटणी)

 

मंजुषा सोनार

रेसिपी नाव: इडली पात्रातील डाळ तांदळाचे ढोकळे

(सोबत मुगाच्या डाळीची चटणी)

साहित्य:

एक वाटी हरबरा डाळ, तीन वाटी तांदूळ, मीठ, तेल, जिरे, मोहरी, सोडा, कांदा, कोथिंबीर, दही, कढीपत्ता, खोबऱ्याचा किस, बारीक शेव

पाककृती: (ढोकळ्यासाठी)

•    डाळ आणि तांदूळ रवाळ दळून घ्यावे.
•    आदल्या दिवशी रात्री पातेल्यात डाळ तांदळाचे मिश्रण दह्यात किंवा ताकात चवीप्रमाणे भिजत घालावे व रात्रभर झाकून ठेवावे.
•    सकाळी त्यात मीठ, हळद आणि सोडा घालावे. इडलीच्या पिठाप्रमाणे पातळ करावे.
•    इडली पात्राला तेल लावून इडल्यांप्रमाणे त्याला वाफवावे. त्यानंतर ते तयार झाल्यावर सारखे चौकोनी तुकडे करावे.
•    कढईत तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता टाका. ते गरम झाल्यावर गॅस बंद करा. मग कढईत ढोकळ्याचे चौकोनी तुकडे परतवा.
•    वाढताना त्यावर खोबऱ्याचा किस, चिरलेला कांदा, शेव आणि कोथिंबीर टाका.
•    मूगडाळ चटणी सोबत खायला द्या.

पाककृती: (मुगडाळ चटणी)

•    मुगाची डाळ भिजत घालून त्यात दही, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर हे टाकून ते मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या.
•    त्या मिश्रणाला जिरे व हिंगाची फोडणी द्या. झाली खमंग चटणी तयार!
•    ही चटणी ढोकळ्यांसोबत चवीने खा.