Android app on Google Play

 

छंद

 

प्रिया प्रकाश निकुम
नाशिक

आणि त्यांनी चित्र मला दिली......

म्हणतात, माणसाला एक तरी छंद नक्कीच असावा.कारण,छंदामुळे माणसाला एक प्रकारचं समाधानं मिळत.एक वेगळाच आनंद प्राप्त होतो.एखाद्या वेळेला खराब झालेला मुड देखील ह्याने चांगला होण्यास मदत होते. म्हणुनच प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काहितरी एखादा छंद नक्कीच असावा.मला देखील लहानपणापासुन चित्र काढण्याचा फार नाद आहे.जीथे कुठे चित्र नजरेत भरलं की, मी ते लगेच एका को-या कागदावर काढुन ठेवत असे.ही बाब माझ्या आईच्या लक्षात आल्यावर तीने मला एक मोठी ड्रॉईग वही आणुन दिली. मी त्याच्यात आपल्या  बारा  राशींच्या गणपतीने सुरुवात केली. आणि बघता बघता ती वही अर्धी भरुन गेली. पण,कुठेतरी मनाला असे वाटे की,आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळावं.त्याच्या मधले बारकावे समजावुन सुबक पध्दतीने ते अजुन काढायला शिकावावे.कारण ,मला आता लगेच एखादया  कॉलेजला प्रवेश घेण शक्य नव्हत त्यामुळे कोणाचतरी मार्गदर्शन मिळेल ह्या आशेवर मी होती. म्हणजे वाटायचं कि,एखादा छोटयाश्या कालावधीत होणारा कोर्स देखील करता आला तर बर होईल असे वाटे .पण तसं काही घडत नव्हतं.असेच मग दिवसामागून दिवस जात  होते. आणि एक दिवस तशी संधी मिळाली.

आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स हा पेपर लावलेला  होता. ते काहीना काही नवनवीन गोष्टीची  एका दिवसांची किवा दोन दिवसाच्या कार्यशाळा आयोजीत करायचे.एकदा त्यांनी व्यंगचित्राची एका दिवसीय कार्यशाळा आयोजीत केली होती.साक्षात प्रसिध्द व्यंगचित्रकार नामदेव सदावर्ते हे शिकवायला येणार होते.एवढ्या मोठ्या माणसांकडुन शिकायला मिळेल यांची कधी कल्पनाच केली नव्हती.घरच्यांनी देखील आवड असल्यामुळे पटकन होकार दिला. आणि ठरलेल्या दिवशी मी तिथे गेले.सोबत जातांना माझी वही कात्रण देखील घेऊन गेले. त्यांनीदेखील अपेक्षेप्रमाणे हसी मजाक करत शिकवण्यास सुरुवात केली.आम्हाला खुप सोप्या  पध्दतीने पटकन व्यंगचित्र कसे काढतात याचे प्रात्याक्षिक दाखविले.आणि त्या प्रमाणे आमच्या कडुन देखील काढुन घेऊन नजरे खालुन घालत होते.त्यामुळे हे कस काढतात, ते कसं काढतात, हे आम्हाला त्यातुन समजत गेलं. आम्ही काढलेलं चित्र नजरेखालून घालून झालेली चूक देखील छान प्रकारे समजावून सांगत असे . त्यामुळे आपल्याकडे लक्ष नाही असे कोणाचेच झाले नाही . त्यामुळे सगळे मन  लावून ते सांगतील तसे चित्र काढण्यात मग्न राहायचे . आणि अशा त-हेने आनंदाने  आमच्या त्या कार्यशाळेचा समारंभ पार पडला.

ती संपल्या नंतर सगळे जण त्यांना भेटण्यासाठी म्हणून गर्दी करू लागले होते .मग मी जरा गर्दी ओसरल्या नंतर जरा भीतभीतच त्यांच्या टेबला पाशी गेले  व आधी स्वतःची ओळख करुन देत. त्यांना कार्यक्रम छान झाला म्हणुन शुभेच्छा दिल्या आणि मी सुध्दा छोटे मोठे चित्र काढते म्हणुन माझी वही त्यांना दाखवली.त्यांनी देखील काही आढेवेढे न घेता वही बघण्यास घेतली.आणि एकेक चित्र शांततेत बघता बघता माझे कौतुक करण्यास सुरुवात केली.खुप म्हणजे खुपच सुन्दर ह्या शब्दांत त्यांनी माझे कौतुक केले.आणि म्हणाले,"ही,कला कधीच सोडु नको."आणि त्यांनी मग सगळ्यांना माझी वही दाखवली आणि मला काहीतरी भेट देता यावी म्हणून त्यांच्याकडचे असलेले काही चित्र त्यांच नाव टाकुन मला भेटीच्या स्वरूपात त्यांनी सगळ्यांसमोर दिले .हॉल मधल्या सगळ्यांनी माझे टाळ्या वाजुन अभिनंदन केले.माझ्यासाठी ही खुप मोठी गोष्ट होती.घरी आल्यावर आईला मी ते दाखविले.तीला देखील खुप कौतुक वाटले. त्यांनी दिलेल्या चित्राची मी त्यांनतर जसेच्या तसे काढुन बघण्याची प्राक्टिस केली.आज सुध्दा माझ्या कडे ती चित्रे जशीच्या तशी जपुन ठेवली आहे. तो दिवस माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होता .एवढ्या मोठ्या व्यक्तीने पटकन माझ्यासाठी त्यांची काही चित्रे आपल्याकरता काढून दिली  ह्यांच  मला खूप समाधान वाटत होत. त्यानंतर मला हे चित्र काढण्याबद्दलचा आत्मविश्वास आणखी वाढला . म्हणूनच, जेव्हा कधी मी हे चित्र पुन्हा  बघते. तेव्हा मनात एवढच येत परत त्यांची भेट कधी होईल?आणि त्यांना माझे नवे चित्र कधी दाखवु शकेल.