Android app on Google Play

 

चित्रपट समीक्षा - १०२ नॉट आऊट

 

नितीन श्रोत्री, पुणे
९०११०६५८६२

थोड्याशा अनिच्छेनेच आदित्य मागे लागला म्हणून मी हा पिक्चर पहायला गेलो -कारण फेवरीट अमिताभ आणि ऋषी कपूर असले तरी त्यांचा पोस्टरवरचा अवतार बघून काय स्टोरी असणारयाबद्दल मनात शंका होती.

सुरुवातीलाच अमिताभचा जहाँबाज म्हातारा (दत्तात्रय)बघून मजा यायला लागली. अतिशिस्तीत आणि घाबरून जगणाऱ्या मुलाला(ऋषी कपूर उर्फ बाबू ) हा सांगतो की मला बरोबर आणलेल्या चिनीमाणसासारखं ११८ वर्षं म्हणजे अजून सोळा वर्षं जगून वर्ल्ड रेकॉर्ड मोडायचाय आणि ते तुझ्याबरोबर शक्य नाही-म्हणून मी तुला एका वृद्धाश्रमात ठेवायचा विचार करतोय-आणि एका बापाने मुलालावृद्धाश्रमात ठेवण्याचा  हाही  एक रेकॉर्ड असेल.

टरकलेला बाबू गयावया करतो आणि  दत्तात्रय त्याला एक एक अटी घालत जातो -त्याच्या जीवनातल्या विसरलेल्या आनंददायक आठवणी ताज्या करण्यासाठी आणि परत त्याला जिंदादिल बनवण्यासाठी,त्याचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी. यात त्याच्या लहानपणीच्या बागेतल्या विमानातल्या,काश्मीरच्या बदक आणि शालीच्या, पत्नीबरोबर साजऱ्या केलेल्या वाढदिवसाच्या,मुलाबरोबर त्याला आवडणाऱ्या चर्च मधल्या  अशा  खूप छान आठवणी तो बाबूला परत जगायला लावतो आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे  बाबूच्या  चेहऱ्यावरची  कळी खुलते,पडलेले खांदे ताठहोतात."मैं जिंदगी जिते जिते कभीभी मरा नही"हा त्याचा डायलॉग बाबूला खूप काही शिकवून जातो.

आता वेळ येते कठीण परीक्षेची ! बाबूचा मुलगा अमोल त्याच्या वाढदिवसाला फुलांचा गुच्छ पाठवतो तेव्हा तो विरघळून जातो आणि जेव्हा त्याला कळतं की दत्तात्रयने अमोलने केलेले कॉल्स कटकेले आणि आपल्याला सांगितलं नाही तेव्हा त्याला खूप राग येतो.दत्तात्रय त्याला समजावून सांगतो की अमोल केवळ प्रॉपर्टी नावावर करून घेण्याच्या मागे आहे कारण त्याला माहिती आहे की हेदोन्ही म्हातारे आता कधीही टपकतील.बाबूला ह्यातलं लॉजिक कळतं पण त्याचं बापाचं हळवं मन ते मान्य करत नाही. बाबू हा भोलू तर दत्तात्रय फटकळ पण न फसणारा,टफ लव्ह करणाराव्यवहारी आणि कणखर बाप वाटायला लागतो.

२१ वर्षे सतत बाबूला न भेटणाऱ्या,आईच्या असाध्य आजारात आणि ती गेल्यानंतरही भारतात न येणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत "होप यू अंडरस्टँड" म्हणत बापाला गृहीत धरणाऱ्या अमोललासमजायला बाबूला वेळ लागतो.

नंतर तर दोघांमधला तणाव इतका वाढतो की बाबू अमोलला त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा देण्यासाठी दत्तात्रयवर केस करण्याची धमकी देतो.

यानंतर जे घडतं ते प्रत्यक्ष पाहण्यात जास्त मजा येईल.

प्रत्येक प्रसंगात एखादं सुंदर जुनं गाणं अतिशय सुबक आणि आकर्षक निळ्या रंगाच्या विकत घ्याव्याशा वाटणाऱ्या सारेगामाच्या रेडिओवर लावणं इतकं चपखल आहे की त्याला संवादाची गरजचनाही.

"मेरे घर आना जिंदगी","वक्त ने किया क्या हसीं सितम", "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" -ही गाण्यांची निवड एकदम अचूक!

"मेरे बेटे को मैं उसके बेटे के सामने हारने नहीं दुंगा" हा संवाद दत्तात्रयचं बाबूवर असणार अबोल प्रेम दाखवून जातो.

नेहमीप्रमाणे अमिताभमधल्या हरहुन्नरी कलाकाराने (भूमिका सशक्त आहेच)ऋषी कपूर मधल्या एकसुरी आणि लिमिटेड कपॅबिलिटी असलेल्या कलाकारावर मात केली आहे. पण तरीही ऋषीकपूरने त्याचं काम चोख केलंय. खरंतर अमिताभ इन्ट्रोव्हर्ट आणि ऋषी कपूर एक्सट्रोव्हर्ट आहे पण ह्या दोन्ही भूमिका त्यांच्या मूळ स्वभावाच्या एक्झाक्टली ऑपोझिट आहेत –त्यामुळंच करायला जास्त कठीण पण चॅलेंजिंग!

एखा दा सॉलिड डायलॉग झाला की आदित्य माझ्याकडं बघून हळूच हसायचा आणि मी मनातल्या मनात सुखावून जायचो.

प्रत्येक बापाने मुलाबरोबर पहावा असा पिक्चर आहे.